बेळगाव लाईव्ह : बेळगाव सुवर्णसौध येथे १९ डिसेंबर पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात आले होते. अधिवेशन म्हटलं कि मंत्रीमहोदयांची रेलचेल आलीच. आणि मंत्रीमहोदयांच्या पाहुणचारासाठी जिल्हा प्रशासनाची जबाबदारीही ओघाओघाने वाढलीच. मात्र या साऱ्या गोंधळात अधिवेशनापूर्वीपासूनच बेळगावकरांना वेठीला धरण्यात आले....
बेळगाव : खानापूर तालुक्यातील सुरापूर या गावातील शिवराय यल्लाप्पा आयोटी या शेतकऱ्याने कर्जाचा भार सहन न झाल्याने विष प्रश्न करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
विविध बँका आणि सहकारी पतसंस्थांमधील कर्जबाजारीपणाला कंटाळून सदर शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे....
बेळगाव : गेल्या एक वर्षापासून आरक्षणप्रश्नी होत असलेल्या पंचमसाली समाजाच्या मागणीसंदर्भात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत खुशखबर दिली आहे.
आरक्षणाच्या बाबतीत लिंगायत आणि वक्कलिगांसाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकार आणि पंचमसाली...
बेळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हिंडलगा कारागृहात १९५० साली शिक्षा भोगली. या कारागृहातील सावरकरांच्या कोठडीला अनेकजण भेट देण्यासाठी येतात तसेच सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करतात.
अधिवेशनानिमित्त बेळगाव दौऱ्यावर असणारे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनीदेखील आज या कारागृहातील सावरकरांच्या कोठडीला भेट...
बेळगाव : बेळगाव अधिवेशनात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सन २०२२-२३ चा प्राथमिक अर्थसंकल्प सादर केला. बेळगाव मधील सुवर्णसौध येथे भरविण्यात आलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ८,००१,.१३ कोटींचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पात आपत्ती निवारणासाठी १३९६ कोटी,...
बेळगाव लाईव्ह : गेल्या वर्षभरापासून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना यावेळीही मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाबाबत भाजपच्या अंतर्गत सभागृहात कोणतीही चर्चा झाल्याचे निदर्शनात आलेले...
२० अभियांत्रिकी आणि १५ वैद्यकीय जागा सीमावासीयांसाठी राखीव : महाराष्ट्र सरकारचा निर्णय
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या अत्याचाराखाली दबलेल्या सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र सरकारने नागपूर येथील अधिवेशनात ठराव मंजूर केला असून यानुसार महाराष्ट्र सरकारने सीमावासीयांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत....
बेळगाव : कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या विस्तारित प्रकल्प अहवालाला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली. या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलविद्युत मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री...
बेळगाव सुवर्णसौध मधील हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्यांबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. त्याचप्रमाणे उत्तर कर्नाटकातील आमदारांना बोलूही दिला नाही, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
भूतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या आवारात आज गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना...
विधिमंडळ अधिवेशनाच्या नावाखाली पक्षाचे कार्यक्रम दामटण्यात भाजप नेते व्यस्त आहेत. भाजपला दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशी टीका काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केली.
बेळगाव सुवर्णसौध येथे खर्गे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सिद्धरामय्या आणि आमच्यात कसलेही...