27 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 28, 2022

उद्या टायगर सफारीचे होणार उद्घाटन

कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालय बेळगाव येथे टायगर सफारीचे उद्घाटन होणार आहे. भुतरामहट्टी बेळगाव येथे कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयात बनवलेल्या टायगर सफारी आणि इतर नवीन सुविधांचे उदघाटन 29 रोजी होणार आहे. बेळगाव येथील मिनी प्राणीसंग्रहालयाची वैशिष्ट्ये: उत्तर कर्नाटकात प्रथमच टायगर सफारी...

सुवर्ण सौध आवारात या प्रतिमांचे भूमिपूजन

कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव जवळील हलगा येथे बांधलेल्या सुवर्ण सौध समोर कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायन्ना महात्मा गांधीजी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमा बसवल्या जाणार आहेत. 29 डिसेंबर रोजी सकाळी 10: 15 वाजता सुवर्ण सौधच्या आवारात या महापुरुषांच्या...

दरवर्षी 4 हजार युवक होणार प्रशिक्षित -मंत्री डॉ. अश्वथ नारायण

दरवर्षी 4000 युवकांना प्रशिक्षित करण्याचा उद्देश असलेल्या कर्नाटक जर्मन टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (केजीटीटीआय) या संस्थेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ आज बुधवारी उद्यमबाग येथे उत्साहात पार पडला. सदर पायाभरणी समारंभ राज्याचे कौशल्य विकास मंत्री डॉ. सीएन अश्वथ नारायण यांच्या हस्ते झाला. यावेळी...

जिल्हा पंचायतीच्या विस्तारित इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव : बेळगाव न्यायालयाच्या आवारातील जिल्हा पंचायत इमारतीच्याशेजारी २५८ लाख रुपयांच्या निधीतून नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आले. जिल्हा पंचायत इमारतीला संलग्न असलेल्या विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावर ४००० चौरस फूट आणि सुमारे २४०० चौरस फूट पार्किंग...

सीमाभागातील आंदोलकाच्या वाहनाची कोल्हापुरात चोरी

बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथील सीमावासियांच्या भावना महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने नुकतीच 'चलो कोल्हापूर'ची हाक दिली. या अंतर्गत बेळगावमधील हजारो मराठी भाषिक कोल्हापूरला रवाना झाले. २६ डिसेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सीमाभागातील तरुणाच्या...

शाळा घेत आहेत खबरदारी; विद्यार्थ्यांना मास्कची सक्ती

सरकारच्या कोरोना मार्गदर्शक सूचीनुसार सरकारी शाळा वगळता जवळपास सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना फेस मास्क वापरण्याची सूचना करण्यास सुरुवात केली असून कांही शाळांनी तर गेल्या सोमवारपासूनच शाळेत मास्क सक्तीचे अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने शाळा -महाविद्यालयं,...

कर्नाटकातील मंत्र्यांच्या मुक्ताफळांचा महाराष्ट्र विधानसभेत निषेध

बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यातील वातावरण तापले असून काल महाराष्ट्र विधानसभेत सीमाप्रश्नी तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा देणारा ठराव मंजूर केल्यानंतर आज कर्नाटक विधानसभेत कर्नाटकाच्या मंत्र्यांनी मुक्ताफळे उधळली. मुंबईत मराठी माणूस राहत नाही त्यामुळे मुंबई केंद्रशासित करावी असे...

जेडीएस स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करेल

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण हळूहळू तापत चालले असून राज्यात आपलीच सत्ता स्थापन होईल, या दृष्टीने राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज्यात जेडीएस स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करेल, असा विश्वास जेडीएस प्रवक्ते...

फूटपाथवरील ‘या’ पथदिपांना कोणी वाली आहे का?

सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहराची रंगरंगोटी व स्वच्छता करण्यात आली असली तरी बी. एस. येडीयुरप्पा मार्गाच्या फुटपाथ वरील बंदावस्थेतील कांही पथदीप वेलींनी गुरफटलेल्या अवस्थेत धुळ व गंज खात पडून असल्याने पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील...

आमदार बेनकेनी मांडला विद्यार्थ्यांच्या वस्ती गृहाचा प्रश्न

बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी असली तरी ती विकास आणि संधींपासून कायम वंचित आहे, असा मुद्दा बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित केला. विधानसभेत बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव शहराचा विस्तार...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !