Friday, July 19, 2024

/

जिल्हा पंचायतीच्या विस्तारित इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 belgaum

बेळगाव : बेळगाव न्यायालयाच्या आवारातील जिल्हा पंचायत इमारतीच्याशेजारी २५८ लाख रुपयांच्या निधीतून नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आले.

जिल्हा पंचायत इमारतीला संलग्न असलेल्या विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावर ४००० चौरस फूट आणि सुमारे २४०० चौरस फूट पार्किंग क्षेत्र आहे.

तसेच शिक्षण विभागासाठी सभागृह व साठवणुकीची सोय करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर ६२०० चौरस फूट क्षेत्रफळ वाढवून २६ कार्य व्यवस्थापक आणि १ मुख्याधिकाऱ्यांच्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत.Zp bldg

उदघाटन समारंभास जलसंपदा मंत्री तसेच जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ, गृहराज्यमंत्री आरग ज्ञानेंद्र, आमदार अनिल बेनके, खासदार मंगला अंगडी, बेळगाव प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हापंचायत सीईओ दर्शन एच.व्ही. यांच्यासह विविध विभागीय अधिकारी व जिल्हा पंचायत कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.