belgaum

अल्पवयीनाकडे दुचाकी; आणखी एका पालकाला 25 हजारांचा दंड

0
 belgaum


बेळगाव लाईव्ह : अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या घटनांवर कठोर कारवाई सुरू ठेवत रहदारी पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका पालकावर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालकांना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानकाजवळील पोस्टमन सर्कल परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे 8:42 वाजता एक अल्पवयीन मुलगा दुचाकी (क्र. KA-22 HH-1441) चालवत असल्याचे रहदारी दक्षिण विभागाच्या पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्याला अडवून दुचाकीसह ताब्यात घेतले आणि संबंधित वाहनाबाबत नोटीस बजावली.


यानंतर वाहन मालक असलेल्या मुलाच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा असल्याची समज देण्यात आली. तसेच भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

 belgaum


दरम्यान, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहने चालविण्यास देऊ नयेत, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.