belgaum

बेळगाव लाईव्ह’ न्यूज इम्पॅक्ट त्या…चौकाची स्वच्छता

0
 belgaum

‘बेळगाव लाईव्ह’ न्यूज इम्पॅक्ट
ध. छत्र. संभाजी महाराज चौक परिसराची कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील मूर्ती आणि परिसराची देखभाल बेळगाव महानगरपालिकेकडून केली जाते. दरम्यान, ‘बेळगाव लाईव्ह’ने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये या परिसरात कचरा आणि मद्याच्या बाटल्या पडल्याचे समोर आले होते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या परिसराची स्वच्छता केली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील वनिता विद्यालय शाळेसमोरील रस्त्यावर सफाई कर्मचारी काम करत होते. व्हिडिओ पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने तातडीने चौक परिसरात पोहोचून तिथला कचरा आणि मद्याच्या बाटल्या काढून परिसर स्वच्छ केला.

 belgaum

यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, राष्ट्रीय नायकांचा आदर आणि सन्मान करणे म्हणजे देशाचा सन्मान करणे आहे, तसेच सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.