belgaum

गोकाकजवळ अपघात! तिघांचा मृत्यू; चौघे गंभीर

0
Gokak news
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात मालदिन्नी क्रॉसजवळ पहाटेच्या सुमारास भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. लारी आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सवदत्तीकडे जाणारी कार आणि यरगट्टीहून गोकाकच्या दिशेने येणारी लारी यांच्यात मालदिन्नी क्रॉसजवळ जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या अपघातात कारमधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर चौघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

मृत व्यक्ती पुणे येथील मांद्रे कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत आणि जखमींची संपूर्ण नावे तसेच इतर तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

घटनेची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.या भीषण अपघातामुळे मालदिन्नी क्रॉस परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.