belgaum

१४, १६ आणि १७ नोव्हेंबरला वीजपुरवठा बंद; अनेक भागांना फटका

0
Hescom no light logopower cut
 belgaum

बेळगाव लाईव्ह : वीज वितरण केंद्रांमधील देखभाल आणि तिमाही दुरुस्तीच्या कामांमुळे बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये १४, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तिन्ही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे.

१४ नोव्हेंबर : सुवर्णसौध वीज वितरण केंद्र

११० केव्ही सुवर्णसौध वीज वितरण केंद्रांतर्गत एफ-५ बसवेश्वर सर्कल, एफ-६ हरिकाका कंपाऊंड आणि एफ-९ येडियुरप्पा रोड फिडरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

 belgaum

यामुळे शाहापूरमधील नवी गल्ली, गणेशपुरा गल्ली, गाडे मार्ग, बसवण गल्ली, पवार गल्ली, सराफ गल्ली, खडे बाजार, मारुती नगर, हरिकाका कंपाऊंड, एससी मोटर्स, गोकुळ गल्ली, जय किसान भाजी मार्केट, साई कॉलनी, येडियुरप्पा मार्ग, हळगा रोड, बाजार गल्ली, खासबाग बसवण गल्ली, राघवेंद्र कॉलनी आणि नागेंद्र कॉलनी या परिसरांना वीजपुरवठ्याचा फटका बसणार आहे.

१६ नोव्हेंबर : श्रीनगर उपकेंद्र

३३/११ केव्ही श्रीनगर उपकेंद्रातील तिमाही देखभाल कामामुळे एफ-२ श्रीनगर, एफ-३ आंजनेयनगर आणि एफ-७ आयसीएमआर फिडरवरील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

यामध्ये वंटमुरी कॉलनी, सेक्टर क्रमांक ५, श्रीनगर गार्डन डबल रोड, साई मंदिर परिसर, आंजनेयनगर, सेक्टर क्रमांक १०, गणेश मंदिर, आयटी कॉलनी, लव्हडेल, सेक्टर क्रमांक १२ आणि आयसीएमआर परिसराचा समावेश आहे.

१७ नोव्हेंबर : फोर्ट उपकेंद्र

३३/११ केव्ही फोर्ट उपकेंद्रातील तिमाही देखभाल कामामुळे एफ-१ आझादनगर, एफ-५ शेट्टी गल्ली, एफ-६ खडे बाजार आणि एफ-८ माळी गल्ली फिडरवरील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

यामुळे समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, रिसालदार गल्ली, नरवेकर गल्ली, काकतीवेस रोड, कचेरी रोड, कंजर गल्ली, दरबार गल्ली, खडे बाजार, माळी गल्ली, तेंगिनकेरी गल्ली, बेंडी बाजार, पांगुळ गल्ली, भोवी गल्ली, मेणशी गल्ली, आझाद गल्ली, कामत गल्ली, आयबी बसस्थानक, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, नाना पाटील चौक, जलगार गल्ली, कीर्ती हॉटेल, कोतवाल गल्ली, डीसी बँक परिसर, शीतल हॉटेल आणि शंकम हॉटेल परिसरातील वीजपुरवठा प्रभावित होणार आहे.

१७ नोव्हेंबर : सदाशिवनगर उपकेंद्र

३३/११ केव्ही सदाशिवनगर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या एफ-१ कुमारस्वामी लेआउट, एफ-२ हनुमाननगर आणि एफ-३ सह्याद्रीनगर फिडरवरील तिमाही देखभाल कामे करण्यात येणार आहेत.

यामुळे सारथी नगर, पोलीस कॉलनी, विद्यानगर, पाटबंधारे विभाग कॉलनी, कुमारस्वामी लेआउट, बसवेश्वरनगर, कुवेंपूनगर, मुरलीधर कॉलनी, श्री. सतीश जारकिहोळी यांच्या घरामागील परिसर, लक्ष्मी हेब्बाळकर परिसर, आझाद हाऊसिंग सोसायटी, श्रीराम कॉलनी, ताजिबा देसाई कॉलनी, हनुमाननगर सर्कल, हनुमाननगरचे पहिल्या ते पाचव्या टप्प्यातील परिसर, केएलई स्कूल, प्रेस कॉलनी, चिक्कुबाग, सह्याद्रीनगर, महाबळेश्वर मंदिर, निलगिरी ट्रीस, सह्याद्रीनगर पाण्याची टाकी आणि बसवेश्वरनगर वॉटर सप्लाय प्लांट या भागांतील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

१७ नोव्हेंबर : नेहरूनगर उपकेंद्र

११०/११ केव्ही नेहरूनगर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या एफ-१५ विश्वेश्वरय्यानगर, एफ-९ सदाशिवनगर, एफ-४ वैभवनगर, एफ-१ इंडाल आणि एफ-१० जैनाबाकुल फिडरवरील देखभाल कामे करण्यात येणार आहेत.

यामुळे इंडस्ट्रियल एरिया, वैभवनगर, न्यू वैभवनगर, विद्यागिरी, अन्नपूर्णवाडी, बसव कॉलनी, आझम नगर, संगमेश्वर नगर, केएलई, शाहूनगर, विनायक नगर, ज्योतीनगर, एपीएमसी, उषा कॉलनी, सिद्धेश्वर नगर, इंडाल परिसर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, आंबेडकर नगर, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, जिल्हा न्यायालय, डीसी कंपाऊंड परिसर, सिटी पोलीस लाईन, काकतीवेस, काळी आमराई, क्लब रोड, रेलनगर, संपिगे रोड, सदाशिवनगर, विश्वेश्वरय्या नगर, टीव्ही सेंटर, पी अँड टी कॉलनी (हनुमाननगर), मुरलीधर कॉलनी आणि हनुमाननगर परिसरातील वीजपुरवठा प्रभावित होणार आहे.

संबंधित भागातील नागरिकांनी या नियोजित वीजखंडित कालावधीची नोंद घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.