बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सिटिस २.० प्रकल्पाच्या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.
बेळगाव शहरातील घनकचरा व्यवस्थापनाला आधुनिक स्वरूप देण्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांच्यासह दक्षिण उत्तरच्या लोकप्रतिनिधीनी यांनी या बैठकीला हजेरी लावली.
या प्रकल्पांतर्गत शहरात ट्रान्स्फर स्टेशन्स, बायोगॅस प्रकल्प आणि कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी चाळीस टक्के, तर महापालिकेचा वीस टक्के हिस्सा या निधीत असणार आहे.
प्रकल्पातील तांत्रिक बाबी आणि संभाव्य अडचणींचा आढावा घेण्यासाठी हा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. आगामी सोमवारी तांत्रिक समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग येईल.
शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम निर्णायक ठरेल, असा विश्वास आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केला. तर विकासाच्या मुद्द्यावर सर्व लोकप्रतिनिधी एकजूट असल्याचे दक्षिण लोकप्रतिनिधीनी यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त कार्तिक एम., उपायुक्त लक्ष्मी निप्पाणिकर, सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्षा सारिका पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.




