Saturday, April 27, 2024

/

सीमाभागातील आंदोलकाच्या वाहनाची कोल्हापुरात चोरी

 belgaum

बेळगाव : सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे लक्ष वेधून येथील सीमावासियांच्या भावना महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने नुकतीच ‘चलो कोल्हापूर’ची हाक दिली.

या अंतर्गत बेळगावमधील हजारो मराठी भाषिक कोल्हापूरला रवाना झाले. २६ डिसेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सीमाभागातील तरुणाच्या वाहनाची आंदोलन स्थळावरून चोरी झाल्याने आंदोलनातील कार्यकर्त्यावर संकट ओढवले आहे.

कर्नाटकातील सरकार तरुणांवर कमी अत्याचार करते कि काय म्हणून महाराष्ट्रात तरुणावर हे संकट ओढवावे हि चिंतेची बाब ठरली आहे. सीमाभागातील मराठी तरुणांवर येथील प्रशासन जाणीवपूर्वक अत्याचार करतेच. या ना त्या कारणास्तव चुकीच्या तक्रारी दाखल करून खोट्या केसीस घालण्यात येतात.Vehicle theft kop

 belgaum

या प्रकाराला कंटाळूनच तरुणांनी कर्नाटकी पाशातून सोडविण्यासाठी महाराष्ट्र दरबारी आपली केविलवाणी परिस्थिती मांडण्यासाठी आंदोलन केले. आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव ते कोल्हापूर दौरा निश्चित केला. मात्र आंदोलनस्थळावरून गायब झालेल्या दुचाकीमुळे या मराठी तरुणाला अधिकच त्रास सोसावा लागला आहे.

आंदोलन स्थळी पार्क करण्यात आलेली स्प्लेंडर प्लस हि दुचाकी चोरी झाली आहे. KA -22 HA 1086 असा वाहन क्रमांक असलेली दुचाकी चोरीला गेली असून याप्रकरणी कोल्हापूर पोलीस विभाग आणि स्थानिक नेत्यांनी गांभीर्याने लक्ष पुरवावे, तसेच या तरुणाला आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी सीमाभागातून होत आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनीही घडल्या प्रकारची गांभीर्याने दखल घेऊन दुचाकी शोधण्यासाठी पाठपुरावा करावा, अशीही मागणी पुढे आली आहे.

अलीकडे अनेक ठिकाणी चोरीच्या घटनांचे सत्र वाढले आहे. मात्र भरदिवसा झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गर्दीचा फायदा घेत या दुचाकी चोरीचा बेत आखल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत असून याप्रकरणी शाहू पोलीस स्थानकात तक्रार नमूद करण्यात आली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कोल्हापूर शाहूपुरी स्थानकाच्या पोलिसांनी चोरीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय या कार्यकर्त्याची दुचाकी लवकरात लवकर शोधून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.