Saturday, April 20, 2024

/

सुवर्ण सौध आवारात या प्रतिमांचे भूमिपूजन

 belgaum

कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव जवळील हलगा येथे बांधलेल्या सुवर्ण सौध समोर कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळी रायन्ना महात्मा गांधीजी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमा बसवल्या जाणार आहेत.

29 डिसेंबर रोजी सकाळी 10: 15 वाजता सुवर्ण सौधच्या आवारात या महापुरुषांच्या प्रतिमांचे भूमिपूजन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई करणार आहेत.

मागील वर्षीच्या विधानसभेच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या प्रतिमांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी विधानपरिषद चे सभापती बसवराज होरट्टी यांच्या सह दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते सिद्धारामयया बी के हरिप्रसाद,सर्व मंत्री आमदार वरिष्ठ शासकीय सरकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.