मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 9 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता हिंदवाडीतील आनंदवाडी आखाड्यामध्ये मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी पै. नागराज बसीडोनी आणि पुण्याचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. संतोष पडोलकर यांच्यात होणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाची कुस्ती एम.ई.जी सेंटर बेंगलोरचा पै. आकाश घाडी आणि राशिवडे कोल्हापूरचा इंटरनॅशनल चॅम्पियन पै. सौरभ पाटील यांच्यात, तर तृतीय क्रमांकाची कुस्ती पै. पवन चिकदिनकोप (ता. भांदूर गल्ली) आणि पै. किर्तिकुमार बेनके (ल. कंग्राळी) यांच्यात खेळविले जाणार आहे. या व्यतिरिक्त सदर कुस्ती मैदानात लहान मोठ्या 51 कुस्त्या होणार आहेत.
बऱ्याच कालावधीनंतर हिंदवाडीच्या आनंदवाडी आखाड्यात होणाऱ्या या कुस्ती मैदानास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके,
बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, काँग्रेस नेते इरफान तालिकोटी, माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळळी आदी मान्यवर हजेरी लावणार आहेत.