सार्वजनिक शिक्षण विभागाने दहावीच्या पूर्वपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वेळापत्रकानुसार,ही परीक्षा 21 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होईल.
तपशील खालीलप्रमाणे:
21 फेब्रुवारी: प्रथम भाषा; फेब्रुवारी 22: सामाजिक विज्ञान; फेब्रुवारी 23: दुसरी भाषा; 24 फेब्रुवारी : गणित; 25 फेब्रुवारी: तिसरी भाषा आणि 26 फेब्रुवारी: विज्ञान.
विद्यार्थ्यांनी योग्य तयारी करून पूर्व परीक्षेला सामोरे जाण्याची सूचना करण्यात आली आहे. वार्षिक परीक्षेच्या तोडीची ही परीक्षा विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धतीची जाण व्हावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी घेण्यात येते.