कर्नाटक हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा याचं आयोजन करणार आहे ज्या ज्या वेळी बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावात हिवाळी अधिवेशन भरवले त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळाव्याचे आयोजन करून हिवाळी अधिवेशनात तोडीस तोड उत्तर देत मेळाव्यास प्रत्युत्तर दिलेलआहे.
यावर्षी देखील 13 डिसेंबर पासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये होणार आहे या पाश्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मेळाव्याचे आयोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आता पर्यंतचे सर्व महामेळावे टिळकवाडी येथील वॅक्सिंन डेपो आणि सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर भरवले गेले होते लेले मैदान
केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांनी क्रीडा स्पर्धा पुरता मर्यादित करण्यात आला होते त्यानंतर समिती नेतृत्वाने मेळावे वॅक्सिंन डेपोवर आयोजन केले होते.मागील 2018 साली झालेल्या अधिवेशना विरोधातील मेळावा मनपाने मैदाना परवानगी न दिल्याने
बाजूला असलेल्या खुल्या जागेत भरवला होता त्यावेळी महाराष्ट्रातील मंत्री धनंजय मुंढे यांनी उपस्थिती लावली होती.
एकीकडे मनपा प्रशासन मैदानावर मेळावे भरवण्यास परवानगी देण्यास टाळाटाळ करत असताना वॅक्सिंन डेपो बाजूच्या खुल्या जागेत शासकीय कामांचे सामान ठेवण्यात आले आहे मेळाव्यासाठी ही जागा अपुरी पडत आहे यासाठी अधिवेशना विरोधातील मेळावा ग्रामीण भागात भरवावा असा विचार समोर येत आहे.
आता पर्यंतचे लढे आणि आंदोलनात बेळगाव तालुक्याचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो चळवळ टिकवण्याच्या दृष्टीने तालुक्याचे योगदान मोठे आहे शिवाय बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी बांधण्यात आलेली सुवर्ण सौध ही इमारत देखील बेळगावच्या ग्रामीण भागाच्या हद्दीत हलगा इथे आहे त्यामुळे त्या अधिवेशना विरोधातील महा मेळावे देखील ग्रामीण भागात घ्यावे असा पर्याय समोर आला आहे.
सीमा लढ्याचे केंद्रबिंदू असलेलं येळ्ळूर किंवा पश्चिम भागातील हिंडलगा, उचगाव आणि बेळगुंदीत किंवा पूर्व भागातील निलजी सांबरा गावात महा मेळाव्याचे फिरते आयोजन करावे असा देखील विचार समोर येत आहे.
शनिवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत मेळाव्याच्या घोषणेची शक्यता आहे मात्र महा मेळावा व्हॅक्सिन डेपोत किंवा तालुक्यातील गावात केला जावा का याबाबत देखील विचार विनिमय सुरू असल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे मात्र बैठकीतील चर्चेत कोणता तो निर्णय घेतला जाणार आहे.