बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आज सोमवारी पार पडलेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि कांही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी हे होते. बैठकीत थकीत वीज बिलासह विविध...
अचानक नगरसेवक जगदीश सवदत्ती यांनी बुलडोझर घेऊन येऊन रामदेव गल्लीतील युरिनल पाडले आहे. अतिशय गरजेची गोष्ट असताना नगरसेवकांनी हा प्रकार केल्याने परिसरातील व्यापारी संतप्त झाले आहेत.त्यांनी लागलीच आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन सदर युरीनल पुन्हा उभारण्याची मागणी केली...
स्थानिक लोकप्रतिनिधीचे आणि स्वच्छता ठेकेदाराच्या दुर्लक्ष पणाने भारतनगर सेकंड क्रॉस गोल्लर चाळीचा रस्ता सध्या अस्वच्छतेचे माहेर घर बनल्यामुळे नागरिकात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भारतनगर सेकंड क्रॉस गोल्लर चाळीचा रस्ता सध्या अस्वच्छतेचे माहेर घर बनला आहे. या रस्त्याच्या तोंडावर कायम...
17 डिसेंबर रोजी झालेल्या शिवराय अवमान विरोधी आंदोलनात अटक झालेल्या 38 जणा व्यतिरिक्त एकूण 61 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी म ए समितीचे नेते मदन बामणे यांना देखील जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.
38 जणा व्यतिरिक्त अनेकांवर गुन्हे...
रस्ता चुकल्याने असहाय्य निराधार अवस्थेत रस्ता कडेला पडून असलेल्या भटिंडा पंजाब येथील एका वृद्ध इसमाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलासा देताना त्याला त्याच्या गावी माघारी पाठवून देण्याची व्यवस्था केल्याची घटना काल घडली.
याबाबतची माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते...
आपल्या शहरात अनेक खाजगी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल्स आहेत. यामागे प्रत्येकाचा व्यावसायिक दृष्टिकोन असतो. तथापि निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता युवती -विद्यार्थिनींसह गृहिणींच्या मनातील दुचाकी चालवण्याच्या सुप्त इच्छेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी धडपडण्याच्या वृत्तीमुळे शितल प्रभावळकर या इतरांपेक्षा वेगळ्या...
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या शहराकडील आवार भिंतीला लागून असणाऱ्या फुटपाथवर एके ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
या ठिकाणी फुटपाथवर सर्वत्र गलिच्छ हिरवट सांडपाणी पसरले आहे. तुंबलेल्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे येथून ये-जा करणाऱ्या पादचार्यांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
बसस्थानकाच्या...
सालाबादप्रमाणे लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या मोदगे (मोहनगा -दड्डी) येथील श्री भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा येत्या 15 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून 19 रोजी पालखी सोहळ्याने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
श्री भावकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भाऊराव विष्णू पाटील आणि...
सौंदत्ती श्री रेणुका देवी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी घेतला असून तसा आदेश आज सोमवारी जारी केला आहे. त्यानुसार श्री रेणुकादेवी मंदिरासह जिल्ह्यातील 9 मंदिरे आता दर्शनासाठी खुली झाली आहेत.
शासनाने कोरोना संबंधीचे नियम...
बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या खडेबाजार या प्रमुख बाजारपेठेच्या मार्गावर अलीकडे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे ही बाजारपेठ आहे की 'रेड लाइट एरिया' अशी परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून शहराला बदनाम करणारा हा...