20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 2, 2021

‘राईटस’ करणार नाही बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग

कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड नव्या रेल्वेमार्गसह शिमोगा -शिकारीपुरा -राणीबेन्नूर रेल्वे मार्ग आणि तुमकुर -देवनगिरी रेल्वे मार्ग प्रकल्पांचे काम हाती घेऊ नये, अशी सूचना रेल्वे मंत्रालयाने राईटस या आघाडीच्या वाहतूक पायाभूत सुविधा सल्लागार आणि अभियांत्रिकी उद्योग समूहाला केली आहे. रेल्वे...

अधिवेशन रद्द करा : सचिवालय कर्मचाऱ्यांची मागणी

कोरोना विषाणूच्या ओमिक्राॅन व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे येत्या 13 डिसेंबरपासून आयोजित केले जाणारे विधीमंडळाचे अधिवेशन रद्द करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य सचिवालय कर्मचारी संघटनेने विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांच्याकडे केली आहे. राज्यातील कांही महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी...

बेळगाव विधानसभा अधिवेशन यशस्वीतेसाठी पुरेशी तयारी करा : कागेरी

13 ते 24 दरम्यान हिवाळी अधिवेशन यशस्वी होण्यासाठी शासन आणि जिल्हा शासनाने उत्तम निवास, वाहतूक, भोजन आणि शिष्टाचार सुनिश्चित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात.अशी सूचना विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी दिल्या. ते आज सुवर्ण विधानसौध च्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित अधिवेशनाच्या पूर्वतयारी बैठकीला...

देशात प्रथमच कर्नाटकात आढळले 2 ओमिक्राॅन रुग्ण

कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमिक्राॅनचे दोन रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. या पद्धतीने राज्यात ओमिक्राॅनचा शिरकावा झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे एकच खळबळ उडाली असून ओमिक्राॅनचे रुग्ण आढळण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. आफ्रिका देशातून...

शनिवारी होणार महामेळाव्या बाबत अधिकृत निर्णय?

शनिवारी होणार महामेळाव्या बाबत अधिकृत निर्णय-आगामी 13 डिसेंबर पासून बेळगावात कर्नाटक विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने ज्यावेळी अधिवेशन भरवलं आहे त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळाव्याचे आयोजन करत कानडी अधिवेशनास महा मेळाव्याने...

भुतरामनहट्टी ‘झू’मधील सिंहाचा मृत्यू!

तीन महिन्यापूर्वी शहरानजीकच्या भुतरामनहट्टी झू अर्थात प्राणी संग्रहालयामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेल्या सिंह -सिंहिणीच्या जोडीतील 'नकुल' या सिंहाचे व्यवस्थित देखभाल न झाल्याने आजारपणामुळे निधन झाले आहे. नकुल हा सिंह काल बुधवारी रात्री पावसामध्ये मृतावस्थेत पडलेला आढळून...

ऑक्सिजन योद्ध्यांना भेटण्याची संधी रविवारी

60 हजार फूट उंचीवर उणे 60 अंश तापमान असलेल्या सियाचीन रणभूमीत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक जवान शहीद होत आहेत हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारणीसाठी लोकवर्गणीतून तब्बल अडीच कोटी जमविणाऱ्या पुण्याच्या चिथडे दाम्पत्याला भेटण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली...

विद्यार्थ्यांना पाहता येणार नाही यंदा अधिवेशनाचे काम

बेळगावात दोन वर्षानंतर होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाहण्याची शालेय विद्यार्थ्यांची संधी यंदा कोरोनाने हिरावून घेतली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा शालेय विद्यार्थ्यांना अधिवेशनाचे कामकाज पाहण्याची संधी आरोग्याच्या दृष्टिकोनातून न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विधान सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी...

बेळगावसह राज्यात 3 दिवस पावसाचा इशारा

बेळगाव कोल्हापूर पुणे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मंगळवार व बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात...

शाळांमधील गर्दीचे कार्यक्रम टाळा : लवकरच आदेश

कोरोनाने पुन्हा उचल खाल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन महिने शाळा व महाविद्यालयांमध्ये गर्दीचे कार्यक्रम टाळण्याची सूचना केली जाणार आहे. सध्या राज्यातील तीन जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना अशी सूचना करण्यात आली असून इतर जिल्ह्यातील शाळांसाठी लवकरच आदेश जारी होणार आहे. धारवाड, तुमकुर आणि...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !