कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड नव्या रेल्वेमार्गसह शिमोगा -शिकारीपुरा -राणीबेन्नूर रेल्वे मार्ग आणि तुमकुर -देवनगिरी रेल्वे मार्ग प्रकल्पांचे काम हाती घेऊ नये, अशी सूचना रेल्वे मंत्रालयाने राईटस या आघाडीच्या वाहतूक पायाभूत सुविधा सल्लागार आणि अभियांत्रिकी उद्योग समूहाला केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने एका पत्राद्वारे गेल्या 30 नोव्हेंबर रोजी रायटस (आरआयटीईएस) कंपनीला कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड
नव्या रेल्वेमार्गसह शिमोगा -शिकारीपुरा -राणीबेन्नूर रेल्वे मार्ग आणि तुमकुर -देवनगिरी रेल्वे मार्ग प्रकल्पांचे काम हाती घेऊ नये, असे सांगितले आहे.
त्याआधी सदर 4,027 कोटी रुपये खर्चाचे तीन नवे रेल्वेमार्ग उभारणीची मोठी ऑर्डर राईटस कंपनीला देण्यात आली होती.