छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करायला आलेल्या तिघां युवकांना संतप्त ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.बेळगाव तालुक्यातील होनगा गावांत सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
शिव मूर्तीच्या कट्ट्यावर तिघे युवक येऊन गोंधळ घालत होते त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या घटनेची...
पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हिरेबागेवाडी जवळ कन्नड संघटनांनी केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरून धावणाऱ्या महाराष्ट्र पासिंग वाहनांची हत्तरगी येथेच अडवणूक करण्यात आली.
सुरक्षेच्या मुद्द्यावरून अनेक तास या वाहनांना अडवून ठेवण्यात आले होते. बेंगळूर कडे निघालेल्या वाहनचालकांना या आंदोलनाचा फटका बसला होता.
सोमवारी...
कर्नाटकातील भाजप सरकारची गुप्तचर यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे सर्वत्र संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असून कोणतीही घटना घडण्यापूर्वी गुप्तचर विभागाकडून उपलब्ध माहिती मिळवण्याचे कामच ठप्प झाले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.
सध्या...
बलात्कार टाळता येत नसेल तर त्यातून आनंद लुटा अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून कर्नाटकाचे माजी सभापती आणि काँग्रेस नेते आमदार रमेश कुमार वादाच्या भोवर्यात अडकले आहेत.
सोमवारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आंदोलनाने रमेशकुमार चांगलेच हादरून गेले आहेत.बलात्कारासारख्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या...
सीमाभागात आणि संपूर्ण कर्नाटकात सध्या जी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांना कारण काँग्रेसच असून काँग्रेस पक्षाचा या राजकारणामध्ये फार मोठा हात आहे.
राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला काळे फासणे असो किंवा पुतळ्यांची मोडतोड असो या साऱ्यामध्ये काँग्रेसच कारणीभूत असून त्याच्या मागे काँग्रेसचा...
बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या परिसरात वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्याची घोषणा करण्याबरोबरच या पुतळ्यांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला.
महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणायची का? याबाबत...
भरतेश पॉलीटेक्निक कॉलेजमधील कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा अभ्यासक्रम 93 टक्के गुण संपादन करून पूर्ण करणाऱ्या प्रियांका निलजकर हिने यंदाच्या इंजीनियरिंग लॅटरल एंट्रीच्या डीसीइटीमध्ये राज्यात 53 क्रमांक मिळविला आहे.
प्रारंभापासून एक हुशार विद्यार्थिनी म्हणून सुपरिचित असलेली प्रियांका ही डी. वाय. चौगुले भरतेश...
हलगा येथील बेळगाव शहराच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधात आणि अलारवाड येथेच हा प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी शेतकरी नेते नारायण सावंत आणि अन्य चौघांनी कर्नाटक मुख्य न्यायाधीश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर दोन वर्षापूर्वी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी येत्या 2 फेब्रुवारी...
कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची झालेली विटंबना आणि बेळगावात मराठी माणसांवर होत असलेला अन्याय याच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.
ही तक्रार कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के एस. ईश्वरप्पा यांना...
मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस तर म.ए.समितीवर बंदीसाठी निजदचा दोन्ही सदनात गोंधळ-बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
काँग्रेस पक्षाने विद्यमान भाजप मंत्र्याच्या जमीन घोटाळा आणि राजीनाम्याच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली आहे. याचवेळी निधर्मी...