belgaum

बलात्कार टाळता येत नसेल तर त्यातून आनंद लुटा अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून कर्नाटकाचे माजी सभापती आणि काँग्रेस नेते आमदार रमेश कुमार वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत.

bg

सोमवारी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आंदोलनाने रमेशकुमार चांगलेच हादरून गेले आहेत.बलात्कारासारख्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या बाजूने केलेल्या विधानाच्या विरोधात महिला मोर्चाच्या सदस्यांनी रमेश कुमार यांना चांगलेच धारेवर धरले .

सोमवारी रमेश कुमार यांच्या विधानाच्या विरोधात एक प्रचंड मोठे आंदोलन भाजप महिला मोर्चातर्फे घेण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या डॉ सोनाली सरनोबत तसेच इतर अनेक नेत्यांच्या नेतृत्वखाली महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या.Sonali sarnobat

बलात्कार करण्याची प्रवृत्ती अतिशय हीन आहे. या हीन प्रवृत्ती विरोधात महिलांना सक्षम करणे ,सबळ करणे ही गरज आहे. असे असताना जर तुम्हाला बलात्कार टाळता येत नसेल तर त्याचा आनंद लुटा अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून आपल्या हीन प्रवृत्तीचे दर्शनच या रमेश कुमार यांनी दाखवले असून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी.

अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
मोर्चा मधील संघटीत महिला शक्ती ने केलेला हा विरोध काँग्रेसला बॅकफूटवर घेऊन गेला असून काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने केलेले हे विधान पक्षाला आणि संबंधित नेत्यालाही हादरवून टाकणारे ठरले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.