Friday, April 19, 2024

/

…तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू : बोम्मई

 belgaum

बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या परिसरात वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्याची घोषणा करण्याबरोबरच या पुतळ्यांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणायची का? याबाबत कायद्याच्या चौकटी चौकशी करून निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात लाल-पिवळा ध्वज जाळल्या प्रकरणी आणि सध्या झालेल्या संगोळी रायण्णा पुतळ्याच्या अवमानाबाबत महत्त्वाची चर्चा आज अधिवेशनात झाली. त्यावेळी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी उपरोक्त वक्तव्यं केली. या चर्चेत सहभागी होताना विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे देशासाठीचे योगदान हे नव्याने सांगण्याची गरज नाही असे सांगून सातत्याने कन्नड लोकांचा अवमान करणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी केली.

दरम्यान राज्याची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्यामुळे गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कांही गुंडांना तडीपार करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असेही सिद्धरामय्या यावेळी म्हणाले. वारंवार अपमान करणाऱ्या म. ए. समितीवर बंदी घालताना कायद्याच्या चौकटीत काय करता येईल ते सर्वांनी पहावे, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

 belgaum

बेळगाव हे कर्नाटकचे आणखी एक महत्त्वाचे शक्ति केंद्र बनले आहे. तेंव्हा सूर्य -चंद्र असेपर्यंत येथील एक इंच जमीन कोणत्याही राज्याला देणार नाही आणि कोणाशी त्याबाबत चर्चा ही करणार नाही. महाराष्ट्रातील कन्नडिगांचे संरक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे स्पष्ट करून महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळल्या प्रकरणी तेथील पोलिस अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यावेळी दिली. सध्या दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असून याबाबत मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन, असे ते म्हणाले.

बेंगलोर, बेळगाव व खानापूर येथील सर्व घटनांची सखोल चौकशी केली जाईल. बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या प्रवेशद्वारासमोर वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी करून टाकली. तसेच एमईएस कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल, असेही सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.