सद्यपरिस्थितीत हिंदूंच्या रक्षणासाठी कोणीही राजकारणी पुढे येणार नाही परंतु हजारोंच्या संख्येने युवकांनी पुढे यावे असे प्रतिपादन हैदराबादचे आमदार राजासिंग ठाकूर यांनी केले.
बेळगाव शहरानजीकच्या गणेशबाग येथे आयोजित हिंदू कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा आणि भोजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राजकारणात नेत्यांना भवितव्य नसतं....
बेळगाव शहरातील रविवार पेठेतील कलमठ रोड या गेल्या सुमारे 6 वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्याची पार दुर्दशा झाली असून या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही? असा संतप्त सवाल रविवार पेठेतील व्यापारी आणि नागरिकांकडून केला जात आहे.
शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या...
कागवाड (जि. बेळगाव) तालुक्यातील मोळे गावच्या जगदीश अडहळ्ळी या यूपीएससी परीक्षा 440 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवकाची आंध्रप्रदेश केडर आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमध्ये 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जगदीश अडहळ्ळी...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे या वर्षभरात 4 कोटी 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दंड वसुली घट झाली असून त्याला कोरोना संसर्ग, लॉकडाउन आणि विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कारणीभूत ठरले आहे.
संपूर्ण...
देशात चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक सक्रिय प्रकरणे कर्नाटकात आहेत. 7,271 सक्रिय प्रकरणांसह, कर्नाटकात कोविड-19 ची चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रकरणे अजूनही उपचारांत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केरळ 26,265 सक्रिय प्रकरणांसह यादीत अग्रस्थानी आहे, तर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल अनुक्रमे 12,108...
रस्त्यावरून जाणाऱ्या कारगाडीवर संपूर्ण झाड बुंध्यासकट उन्मळून पडल्याची थरारक घटना सुळगा (ता. जि. बेळगाव) गावानजीक वेंगुर्ला रोडवर काल रात्री 11:30 च्या सुमारास घडली असून या जीवघेण्या घटनेत दैव बलवत्तर म्हणून कारमधील कोणालाही गंभीर इजा झाली नाही. तथापी कारगाडीचा मात्र...
कर्नाटक दूध महासंघाला KMF दुधाच्या किरकोळ विक्री दरात वाढ करण्याची परवानगी मिळावी यासाठी राज्यातील दूध उत्पादकांनी पुन्हा सरकारकडे दाद मागितली असून,यावरील निर्णय प्रलंबित आहे. गेल्या अडीच वर्षांत दुधाच्या दरात वाढ करण्यात आली नाही.
या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. येत्या...
ओमीक्रॉन धोका आणि घोंगावणारे संकट यावर मात करण्यासाठी कर्नाटक सरकारने आता नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात मंगळवार दिनांक 28 पासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून दररोज रात्री दहा ते पहाटे पाच पर्यंत हा कर्फ्यू लागू...
एमईएसने ही घटना कशामुळे झाली हे सांगितले नाहीः प्रल्हाद जोशी- केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, मराठी आणि कन्नडिगा यांच्यात चांगले सुरेल नाते आहे.
हुबळीत बोलायचे तर कन्नडिग आणि मराठे सगळेच इथे एकत्र आहेत, काही जण स्वतःची पोटे भरण्यासाठी हे...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपण परदेशात जाण्याची शक्यता नाकारली आणि दावोस येथे होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.त्यामुळे मी सद्या परदेशात जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
"मला दावोसमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावायची होती, जो पुढे ढकलण्यात आला आहे....