Friday, April 19, 2024

/

हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणी कुचकामी : आम. ठाकूर

 belgaum

सद्यपरिस्थितीत हिंदूंच्या रक्षणासाठी कोणीही राजकारणी पुढे येणार नाही परंतु हजारोंच्या संख्येने युवकांनी पुढे यावे असे प्रतिपादन हैदराबादचे आमदार राजासिंग ठाकूर यांनी केले.

बेळगाव शहरानजीकच्या गणेशबाग येथे आयोजित हिंदू कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळावा आणि भोजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राजकारणात नेत्यांना भवितव्य नसतं. तेंव्हा हिंदुत्ववादी हिंदू कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्यास हिंदू राष्ट्राची निर्मिती होऊ शकते. यासाठी आगामी काळात हिंदू युवकांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात चळवळ उभारावी, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी केले.Rajasing thakur

छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार घेऊन लढा दिला नसता तर आज आपण हिंदू राहिलो नसतो. आज अनेक हिंदू धर्मांतर करत आहेत ते योग्य नाही.

 belgaum

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपण सर्वांनीच परिश्रम घ्यावयास हवेत असे सांगून आमदार राजासिंग ठाकूर यांनी केंद्र आणि राज्य सरकार हिंदूंच्या हितासाठी करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.

यावेळी आयोजकांच्या वतीने आमदार राजासिंग ठाकूर यांचा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास खासदार मंगला अंगडी, बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, भाजप युवा नेते धनंजय जाधव, रमेश देशपांडे, पृथ्वी सिंह आदींसह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि बहुसंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.