बंगळूर सदाशिवनगर मध्ये झालेल्या शिवरायांच्या मूर्तीच्या अवमानाच्या घटने नंतर शिवभक्त संतप्त झाले असून बेळगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान संभाजी चौकात शेकडो युवकांनी निदर्शन करून ठिय्या मांडला होता. अज्ञातां कडून तुरळक दगडफेक आणि सौम्य लाठीमारच्या घटना घडल्या आहेत...
जिल्ह्यात नव्याने 6 रुग्ण : सक्रिय रुग्ण झाले 92- बेळगाव जिल्ह्यात आज शुक्रवारी नव्याने 6 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 92 वर पोचली आहे.
जिल्ह्यात आज मृत्यूची नोंद...
राज्यातील ओमिक्राॅन व्हेरीएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नववर्षाचे स्वागत गर्दी न करता साधेपणाने करावे, अशी शिफारस राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने (टीपीसी) केली आहे.
तज्ञांच्या पॅनेलने नववर्ष स्वागताच्या लहानमोठ्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. राज्यातील पब, बार, रेस्टॉरंट...
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांचे शिष्टमंडळ नवी दिल्लीला जाऊन धडकले आणि विविध मागण्यांसाठी अनेक खासदार, मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची त्यांनी भेट घेतली. एकंदर सीमावर्ती भागात यामुळे चैतन्याचे वातावरण पसरले असून युवा कार्यकर्ते करत असलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समितीचे...
राज्यातील शिक्षणाचा चांगला दर्जा कायम ठेवण्यासाठी एसएसएलसी परीक्षेसाठी जुनी परिक्षा पद्धत पुन्हा अवलंबण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना बहुपर्यायी उत्तरं टिक मार्क करण्याऐवजी प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहावे लागणार आहे.
अलीकडच्या काळात प्रश्नाचे उत्तर तपशीलवार लिहिण्याऐवजी दिलेल्या...
धर्मांतर विरोधी कायदा लागू झाल्यास ख्रिश्चन समुदायावरील हल्ल्यांमध्ये वाढ होईल. तेंव्हा कर्नाटकात निष्कारण धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणला जाऊ नये, अशी मागणी भारतीय कुस्ती महासंघातर्फे करण्यात आली आहे.
उपरोक्त मागणीचे निवेदन भारतीय ख्रिस्ती वक्कूट अर्थात महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रशांथ जथन्ना,...
उद्यमबाग येथील गोगटे इंजिनियरिंग कॉलेजच्या आवारामध्ये येत्या 23 डिसेंबर रोजी हायब्रीड जॉब फेअर अर्थात संकरित रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होईल, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण, माहिती -तंत्रज्ञान आणि कौशल्य...
वीज पुरवठ्या अभावी कक्केरी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद पडली असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी या ठिकाणी सुरळीत वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी राज्याचे ऊर्जा आणि...
कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेशकुमार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काँग्रेस नेते माजी विधानसभा अध्यक्ष व विद्यमान आमदार रमेशकुमार यांनी बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभेत बलात्कारावर केलेली टिप्पणी अतिशय धक्कादायक आहे.
या वक्तव्यावरून चहुबाजूने टीकेची झोड उठली आहे. विधानसभेत...
औरंगजेब, टिपू सुलतान अशा धर्मांध राज्यकर्त्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचे संरक्षण केले. शिवराय नसते तर हिंदू धर्मच राहिला नसता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव आयोध्येसह इतर कार्यक्रमात केला आहे.
मराठा समाजानेच हिंदू धर्माचे...