belgaum

औरंगजेब, टिपू सुलतान अशा धर्मांध राज्यकर्त्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंचे संरक्षण केले. शिवराय नसते तर हिंदू धर्मच राहिला नसता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव आयोध्येसह इतर कार्यक्रमात केला आहे.

bg

मराठा समाजानेच हिंदू धर्माचे रक्षण केले आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाज विकास महामंडळ स्थापन करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विजापूरचे आमदार बसवनगौडा पाटील -यत्नाळ यांनी केली आहे.

विधानसभेत शून्य वेळेमध्ये विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी राज्यातील मराठा समाजावर अन्याय होत असून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडत आहे. मराठा व मराठी दोन्ही वेगवेगळे आहेत. मराठी भाषा असून त्यांच्या बाबत कोणतीही मागणी करत नाही.basanagouda-patil-yatnal-

पण मराठा समाज मोठा आहे. हिंदू स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली असून त्यांच्या मुळेच देशातील हिंदू सुरक्षित राहिले आहेत. त्यामुळे राज्यातील मराठा समाज व त्याच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना करून मागास व आर्थिक दुर्बलांना मदत करावी अशी मागणी आमदार यत्नाळ यांनी केली.

तसेच मराठा समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच श्रेष्ठ आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आपण विकास महामंडळ स्थापन करणार आणि या समाजाला प्रवर्ग 2 -अ मध्ये समाविष्ट करणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.