belgaum

शिवम असोसिएट्सकडून ठेवीदारांची फसवणूक; सीआयडीचा मोठा खुलासा

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: शिवम असोसिएट्सने ठेवीदारांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, कंपनीने नव्या गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या पैशातून जुन्या गुंतवणूकदारांना व्याज देण्याची पद्धत अवलंबली होती, अशी माहिती सीआयडीचे डीआयजीपी भीमाशंकर गुलेद यांनी दिली.

रविवारी बेळगाव येथील पर्यटन निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलण्णावर याने सुमारे 40,700 गुंतवणूकदारांकडून तब्बल 2,400 कोटी रुपये जमा केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यापैकी मोठी रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यात आली असली तरी सुमारे 660 कोटी रुपयांची तूट आढळली आहे.

स्टॉक मार्केटमध्ये 540 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, त्यापैकी 170 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच आरोपीने कंपनीतून बेकायदेशीररित्या 55 कोटी रुपये वैयक्तिकरित्या घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.

 belgaum

या प्रकरणात आतापर्यंत पाच आलिशान कार जप्त करण्यात आल्या असून, आणखी 11 व्होल्वो XC90 कार खरेदी केल्याचे आढळून आले आहे. त्या देखील जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपासादरम्यान 30 बँक खाती सापडली असून, त्यापैकी सात खात्यांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतरही 4 ते 5 कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

कंपनीकडून चित्रपट कलाकार किंवा इतर नामवंत व्यक्तींना पैसे दिल्याचे आढळल्यास त्यांनाही चौकशीसाठी नोटीस बजावण्यात येईल, असा इशारा सीआयडीने दिला आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या मोठी असल्याने तेथील पोलिसांच्या सहकार्याने तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.