राज्यातील शिक्षणाचा चांगला दर्जा कायम ठेवण्यासाठी एसएसएलसी परीक्षेसाठी जुनी परिक्षा पद्धत पुन्हा अवलंबण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना बहुपर्यायी उत्तरं टिक मार्क करण्याऐवजी प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहावे लागणार आहे.
अलीकडच्या काळात प्रश्नाचे उत्तर तपशीलवार लिहिण्याऐवजी दिलेल्या पर्यायी उत्तरांपैकी एक अचूक उत्तर शोधण्याची पद्धत अवलंबिली जात होती.
मात्र आता माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेल्या नव्या बदलानुसार दहावी अर्थात एसएसएलसी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक मार्काचे 80 प्रश्न सोडवण्याऐवजी दुसऱ्या, पाचव्या आणि दहाव्या प्रश्नाचे उत्तर सध्याच्या पद्धतीप्रमाणे पर्यायी उत्तर टिकमार्क न करता जुन्या परीक्षा पद्धतीप्रमाणे सविस्तर लिहावे लागणार आहे.