Tuesday, April 23, 2024

/

बंगळुरू घटनेनंतर बेळगावात वाढला तणाव

 belgaum

बंगळूर सदाशिवनगर मध्ये झालेल्या शिवरायांच्या मूर्तीच्या अवमानाच्या घटने नंतर शिवभक्त संतप्त झाले असून बेळगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान संभाजी चौकात शेकडो युवकांनी निदर्शन करून ठिय्या मांडला होता. अज्ञातां कडून तुरळक दगडफेक आणि सौम्य लाठीमारच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे तणावात वाढ झाली आहे.दरम्यान अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

शेकडो शिवप्रेमींनी शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकात जोरदार निदर्शन केली.गुरुवारी रात्री अज्ञाताकडून बंगळुरू मधील शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली होती त्या घटनेचा व्हीडिओ देखील व्हायरल झाला होता त्याच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी रात्री संभाजी चौकात शेकडो युवक एकवटले त्यांनी जोरदार निदर्शन केली.

सध्या बेळगावात विधी मंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यासाठी मोठया प्रमाणात अधिकारी वर्ग आहे अश्या परिस्थितीत शहरात तणाव निर्माण झाला आहे. युवक एकत्र होताच पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.श्री राम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर सरिता पाटील, अमर येळ्ळूरकर, मदन बामणे,सुनील जाधव,शिवाजी मंडोळकर  सह शेकडोनी घटनेचा निषेध केला.दरम्यान अज्ञातांकडून तुरळक दगडफेक करण्यात आली असून पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार देखील करावा लागला.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेचे पडसाद केवळ बेळगाव शहरात नव्हे तर ग्रामीण भागात देखील उमटले असून कडोली गावात हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केली एकूणच बेळगाव शहरात या घटनेने तणाव वाढला आहे.

 belgaum

बंगळुरू सदाशिव नगर मधील त्या शिवमूर्तीवर शासकीय सन्मानात मूर्तीचा दुग्धभिषेक करण्याची मागणी केली.बेळगावमध्ये शहर तसेंच आसपास च्या ग्रामीण भागात देखील या बद्धल तीव्र निषेध व्यक्त करत लोक जमत आहेत. काही ठिकाणी तुरळक दगडफेक् झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल पिवळ्याची होळी करण्यात आली होती. त्याचा वचपा काढण्याच्या हेतूने कर्नाटकातील काही विघ्न संतोषी लोकांनी भगवा ध्वज जाळून आता शिवाजी महाराजांच्या मुर्तिची विटंबना केली असून त्याचा व्हिडीओ त्या समाजकंटकांकडुन वायरल केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.