18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 30, 2021

कर्नाटकात 566 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद

दैनंदिन कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत असताना, कर्नाटकात बुधवारी 566 नवीन संसर्गाची नोंद झाली असून एकट्या बेंगळुर अर्बनमध्ये त्यापैकी 400 आहेत, ज्यामुळे राज्यातील सक्रिय प्रकरणांची संख्या 7,771 वर पोहोचली आहे. राज्यात एकाच दिवसात 566 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली...

राजद्रोह कलमा विरुद्ध अनेक याचिका : ॲड. बिच्चू

कायद्यातील राजद्रोहाचे 124 ए हे कलम ब्रिटिशांनी 1898 साली अस्तित्वात आणले असले तरी स्वतंत्र भारतात या कलमाची तरतूद घटनाबाह्य ठरवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना नोटीस जारी केली आहे, अशी...

उद्या कर्नाटक बंद नाही,कर्नाटक सुरू

महाराष्ट्र एकीकरण समिती वर बंदी घाला या मागणीसाठी आयोजित करण्यात येत असलेला उद्याचा कर्नाटक बंद मागे घेण्यात आला आहे. या बंदचे पुरस्कर्ते आणि कन्नड कार्यकर्ते वाटाळ नागराज यांनी उद्याचा बंद रद्द करण्यात आला असल्याची माहिती जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत...

हिंदवाडीत भरदिवसा 5 लाखाची घरफोडी

आर. के. मार्ग, हिंदवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल दुपारी उघडकीस आली. भरदिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. आर. के. मार्ग हिंदवाडी येथील यशकुमार राजेंद्र हनबरट्टी...

येळ्ळूर रोड केएलई हॉस्पिटलमधील ‘ही’ गैरसोय होणार दूर

येळ्ळूर रोड, वडगाव येथील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या कमतरतेमुळे होत असलेल्या रुग्णांच्या गैरसोयीबद्दल शहापूरचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आज केएलई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. तेंव्हा कोरे यांनी त्यांना लवकरात लवकर त्या हॉस्पिटलमध्ये पुरेशा डॉक्टरांची...

राजद्रोहाचा गुन्हा : महाराष्ट्राने दखल घेण्याची मागणी

बेंगलोर येथे झालेल्या छ. शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या बेळगावच्या 38 मराठी तरुणावर कर्नाटक पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल प्रकरणी महाराष्ट्र शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ आणि राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका...

वाढीव जीएसटी फेरविचार व्हावा

वस्त्र, पोशाख व पादत्राणे यावरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 5 टक्क्यांवरून 12 टक्के इतका वाढवण्यात आल्यामुळे विणकर, व्यापारी आणि संबंधित कारागीर संकटात सापडले आहेत. तेंव्हा या जीएसटी वाढीचा फेरविचार केला जावा, अशी विनंती द बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे केंद्रीय...

अधिवेशन संपले…अन् दिखावाही संपला

साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा' या सुभाषिताप्रमाणे फक्त अतिमहनीय व्यक्तींच्या आगमनाप्रसंगी शहराची तात्पुरती रंगरंगोटी आणि स्वच्छता करणे हे आपल्या देशात कांही नवीन नाही. कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावकरांनाही आता त्याची प्रचिती येत आहे. बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे दहा दिवसांचे हिवाळी...

आता चोरट्यांचा डोळा दुचाकींवर : मोटरसायकल लंपास

बेळगाव शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नावगे (ता. जि. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे. चोरट्यांनी लांबविली मोटरसायकल नावगे येथील रोहित बेळगुंदकर यांच्या मालकीची असून त्यांनी चोरीच्या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात...

नाट्य कलावंत अनिरुद्ध ठुसे यांना राज्यस्तरीय कला पुरस्कार

बेळगावातील नाट्य कलावंत अनिरुद्ध ठुसे यांना नुकताच रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर -उदगीर (महाराष्ट्र) तर्फे नाटक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'कला' पुरस्कार जाहीर झाला आहे. उदगीर येथे येत्या दि.16 जानेवारी 2022 रोजी या पुरस्काराचे वितरण होईल. रंगकर्मीं प्रतिष्ठान लातूर उदगीर (महाराष्ट्र) तर्फे दर...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !