Saturday, April 20, 2024

/

मराठा मंडळमध्ये पार पडले जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह

 belgaum

बेंगलोर येथील सॅसमोसा एरोनॉटिकल या बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे आयोजित जॉब प्लेसमेंट ड्राईव्ह शहरातील मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतेच पार पडले.

मराठा मंडळ पॉलिटेक्निक कॉलेजमधील सदर जॉब प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये कॉलेजच्या अंतिम वर्षातील 22 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

या जॉब प्लेसमेंट ड्राईव्हमुळे मराठा मंडळाच्या इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या विभागातील विद्यार्थ्यांना एरोनॉटिकल कंपनीमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सदर यशाबद्दल मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष राजेश्री नागराजू आणि प्राचार्य आर. ए. सूर्यवंशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.