Friday, April 26, 2024

/

आता चोरट्यांचा डोळा दुचाकींवर : मोटरसायकल लंपास

 belgaum

बेळगाव शहरासह ग्रामीण भागात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नावगे (ता. जि. बेळगाव) येथे उघडकीस आली आहे.

चोरट्यांनी लांबविली मोटरसायकल नावगे येथील रोहित बेळगुंदकर यांच्या मालकीची असून त्यांनी चोरीच्या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

गेल्या कांही महिन्यांपासून ग्रामीण भागातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

 belgaum

चोरटे गावातील मंदिर आणि घराला लक्ष करून किमती ऐवज लंपास करत आहेत. याबरोबरच चोरट्यांनी आता आपला मोर्चा घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांकडे विशेष करून चोरी करणे सोपे जात असल्यामुळे दुचाकींकडे वळविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.