बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने जी एस टी विभागाच्या मुख्य आयुक्त रंजना झा यांच्याशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
जीएसटीशी संबंधित समस्या आणि सूचनांबाबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाय सुचवून निवेदन...
आपली जागा असल्याचे सांगून घरे व खाजगी जमिनीवर ताबा दाखवण्याच्या कर्नाटक वक्फ बोर्डाच्या प्रक्रियेवर जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीशांनी स्थगिती आदेश दिला आहे. यासंदर्भात आता कोणत्याही प्रकारची हालचाल करता येणार नाही असेच न्यायालयाने सांगितले आहे .
या संदर्भातील निर्णय योग्य ती...
मानव बंधुत्व वेदिके च्या माध्यमातून या वर्षी सहा डिसेंबरला होणार्या कार्यक्रमाचे नेतृत्व के पी सी सी चे कार्याध्यक्ष ,आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी करणार आहेत.
सदाशिनगर स्मशानभूमीमध्ये हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे नेतृत्व पूर्णपणे राहुल जारकीहोळी यांच्याकडे...
गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्यावर अबकारी खात्याच्या पथकाने धाड टाकून मुद्देमालासह 7,75,193 रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला. कणकुंबी येथे आज शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईत एकाला अटक झाली आहे.
दत्तात्रय हनुमंत खानापुरे (रा.वड्डर छावणी, खासबाग -बेळगाव) असे...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉन व्हेरीएंटचे आढळून आलेले दोन रुग्ण या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज शुक्रवारी नवी मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार शाळा -कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदीसह माॅल अथवा चित्रपट व नाट्यगृहातील प्रवेशासाठी लसीकरणाचे दोन डोस अनिवार्य असणार...
दगड मातीने बुजलेल्या गटार व ड्रेनेजच्या पाईपची वारंवार तक्रार करून देखील साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे नगरसेवकाने स्वतःच पुढाकार घेऊन श्रमदानाने गटार स्वच्छ केल्याने नागरिकात प्रशंसोद्गार काढले जात आहेत.
याबाबतची माहिती अशी की, गेल्या एक महिन्यापूर्वी केळकर बाग (गिंडे बोळ) येथे...
विणकरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये सध्या अवाजवी कर वाढीमुळे विणकर अडचणीत आले आहेत. पाच टक्के असणारा जीएसटी 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याने याचा मोठा फटका विणकरांना बसला आहे. कापड आणि पादत्राणांवरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्केपर्यंत केल्याने उत्पादक आणि...
सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे राज्यसभेत विविध प्रश्न खासदार हिरीहीरीने मांडत आहेत. शून्य प्रहर हा सभागृहात सदस्यांना लक्षवेधी सूचना मांडायची सुवर्ण संधी देतो यावेळी बहुतांश सदस्य या संधीचे चीज करतात बेळगावचे राज्यसभा सदस्य खासदार इराणणा यांनी मात्र...
ऐन हिवाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना नेमका कोणता ऋतू सुरू आहे? हेच समजेनासे झाले आहे. 'पावसाळा नाही आणि हिवाळा पण नाही हा तर हिवसाळा' या प्रकारचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या कांही वर्षांपासून वातावरणात मोठे बदल होत असून अवेळी...
'ग्रामीण शिक्षण अभियान' अंतर्गत दुर्गम भागातील शाळकरी मुलांमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'ऑपरेशन मदत' तर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत काजिर्णे (ता. चंदगड) धनगरवाडा येथील मुला-मुलींसाठी 10 सायकलींचे वितरण करण्यात आले.
सदर सायकली वितरणाच्या स्तुत्य उपक्रमाद्वारे चंदगड तालुक्याच्या दुर्गम...