belgaum

‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत दुर्गम भागातील शाळकरी मुलांमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘ऑपरेशन मदत’ तर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत काजिर्णे (ता. चंदगड) धनगरवाडा येथील मुला-मुलींसाठी 10 सायकलींचे वितरण करण्यात आले.

bg

सदर सायकली वितरणाच्या स्तुत्य उपक्रमाद्वारे चंदगड तालुक्याच्या दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलामुलींची धनगरवाडा ते सरकारी न्यु इंग्लिश हायस्कूल चंदगडपर्यंतची व संध्याकाळी परत शाळा ते घर अशी जंगलातील रस्त्यावरून होणारी दररोजची सुमारे 15 -16 कि.मी. पायपीट ‘ऑपरेशन मदत’ च्या माध्यमातून संपुष्टात आणण्यात आली आहे.

याकामी व्हिक्टर फ्रांसिस, बबन कुगजी, अक्षय हुंशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेखा पोटे, डाॅ. राजश्री अनगोळ, डाॅ. अनिल पोटे, गितांजली रेडेकर, विजय बद्रा, संतोष अनगोळकर, डाॅ. केतकी पावसकर व प्रशांत बिर्जे या दानशूरांनी मदत केली.Operation madat

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद हुली, संतोष दरेकर, रिक्षा मामा, प्राचार्य आर आय पाटील, संजय साबळे, शरद हदगल, माऊली ट्रांसपोर्ट, बेलगाम बायसन जीपर्स ग्रूप, काजिर्णे धनगरवाड्याचे गावकरी व ‘ऑपरेशन मदत’ च्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत दुर्गम भागातील शाळकरी मुलांमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘ऑपरेशन मदत’ तर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सद्या खानापूर तालुक्यात व चंदगड तालुक्यात येणाऱ्या दुर्गम भागातील, धनगरवाड्यावरील शाळेच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत आहे. याकामी ‘ऑपरेशन मदत’ अंतर्गत विविध संस्था व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. तरी शिक्षण, क्रिडा, कला व क्षेत्रातील मान्यवर तज्ञांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि देशाच्या नव्या पिढीला घडविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.