कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची झालेली विटंबना आणि बेळगावात मराठी माणसांवर होत असलेला अन्याय याच्या विरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.
ही तक्रार कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के एस. ईश्वरप्पा यांना झोंबली असून उद्धव ठाकरे हे काय आकाशातून आले आहेत का? यांचे सरकार काँग्रेस सोबत असल्यामुळे राज्यातील काँग्रेसने त्यावर उत्तर द्यावे, असं त्यानी म्हटलं.
शिमोगा येथे बोलताना मंत्री ईश्वरप्पा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हे म्हणाले बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती गुंडगिरी करत आहे. त्यांना पाठिंबा दर्शवत मराठी लोकांवर हल्ले होत आहेत असे सांगून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी असे ट्विट ठाकरे यांनी केले आहे.
पण उद्धव ठाकरे काय आकाश आकाशातून आले नाहीत. त्यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यांना उत्तर द्यावे.
राज्याची जमीन, पाणी, भाषा आणि महापुरुषांच्या नांवाने राजकारण करण्यात येऊ नये. राज्यात कांही नतद्रष्ट गोंधळ माजवीत आहेत, ते चुकीचे असून राज्यात सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे, असेही ईश्वरप्पा यांनी सांगितले.