महाराष्ट्रात बस सेवा बंद असल्याने वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव आगाराला दीड वर्षात 27 कोटींचा फटका बसला असून सध्या दिवसाकाठी जवळपास 6 लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे.
बेळगाव आगारातून महाराष्ट्रात रोज 85 बसेस धावतात. त्यातून परिवहन मंडळाला दिवसाकाठी 10 लाखांचा महसूल मिळत होता. लाॅक डाऊन व महाराष्ट्रात चाललेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या संपामुळे बससेवा केवळ महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत धावत आहेत. त्यामुळे दिवसाकाठी केवळ 3 ते 4 लाखाचा महसूल मिळत आहे. कर्नाटकातील चार बस आगारांमधून महाराष्ट्रात धावणार्या बसेसची संख्या 374 आहे. सध्या बेळगाव आगाराला दिवसाकाठी 60 लाखांचा महसूल मिळत आहे. तो यापूर्वी 75 लाखावर होता. दीड वर्षात महाराष्ट्रातून मिळणारा 27 कोटी महसूल बुडाला आहे.
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याऐवजी चार विभागात विभाजन केले आहे. वीस वर्षापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतल्याने राज्य सरकारची परिवहन सेवा महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय चांगली आहे. राज्याच्या चार विभागातून प्रशासकीय काम चालत असल्याने कोणत्या हंगामात कोठे उत्पन्न मिळते, त्याप्रमाणे बससेवा दिली जाते. संपूर्ण राज्यासह महाराष्ट्र, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे 35 हजार 138 बसेस रोज धावतात. महाराष्ट्रात दिवसाकाठी बेळगावातून 85 बसेस धावतात त्यातून 10 लाखांचा महसूल मिळतो. सध्या बस महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत धावत आहेत त्यामुळे महसूल 3 ते 4 लाखावर आला आहे.
वायव्य परिवहन मंडळाचे मुख्य कार्यालय हुबळी येथे आहे. ईशान्य परिवहन मंडळाचे कार्यालय गुलबर्गा येथे आहे. कर्नाटकात देखील परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र त्यांच्या कांही मागण्या मान्य करुन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाकडे एकूण बसेस 35 हजार 138 असून 1 लाख 27 हजार 485 कर्मचारी काम करतात. यापैकी 374 बसेस महाराष्ट्रात धावणाऱ्या आहेत तर बेळगाव आगारातील एकूण बसेसची संख्या 1200 आहे, यापैकी 85 बसेस महाराष्ट्रात धावतात. बेळगाव आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या 3,500 इतकी आहे.
दरम्यान, बेळगाव आगाराचा महसूल दिवसाकाठी 75 लाख आहे, तो आता 60 लाखावर आला आहे. महाराष्ट्रातून 10 लाखांचा महसूल दिवसाकाठी मिळतो तो आता 3 ते 4 लाखांवर आला आहे. महाराष्ट्रात परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप असल्याने कर्नाटकच्या बस महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत धावत आहेत, अशी माहिती वायव्य परिवहन महामंडळाचे विभागीय संचालक पी. वाय. नायक यांनी दिली.