04 -बेळगाव स्थानिक संस्थांच्या मतदारसंघातून कर्नाटक विधान परिषदेच्या दोन जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकी संदर्भात निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांनी सूचना पत्र जारी केले आहे.
सदर सुचना पत्रानुसार निवडणूक लढवू इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज स्वतः किंवा आपल्या प्रस्तावकाकडून मंगळवार दि. 23 नोव्हेंबरपर्यंत सार्वत्रिक सुट्टी वगळता कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्वाचन अधिकारी किंवा सहाय्यक निर्वाचन अधिकार्यांकडे जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथे दाखल करावा. याच ठिकाणी इच्छुकांसाठी उमेदवारी अर्ज उपलब्ध असणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे होईल.
उमेदवारी अर्ज मागे घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना स्वतः किंवा आपला प्रस्तावक किंवा अधिकृत निवडणूक एजन्टा करवी शुक्रवार दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत माघारीचा लेखी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल करावा लागेल. विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया शुक्रवार दि. 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
नूतन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी घेतला पदभार
बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी व्यंकटेशकुमार यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम.जी.हिरेमठ यांची बदली करण्यात आली आहे.
नवनियुक्त जिल्हा अधिकार्यांनी निवडणुकीची तयारी आणि नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती घेतली.
यापूर्वी कर्नाटक प्रादेशिक विकास मंडळाचे सचिव असलेले व्यंकटेशकुमार यांची सरकारने विधानसभा निवडणुकीसाठी बेळगावला बदली केली आहे.