शहरातील भाऊराव काकतकर (बी. के) महाविद्यालयाच्या वुमन वेल्फेअर असोसिएशनतर्फे आयोजित ‘लैंगिक शोषण : कायदे आणि नियम’ या विषयावरील मार्गदर्शनपर कार्यक्रम नुकताच पार पडला.
बी. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्या ॲड. भारती वाळवेकर यांच्यासह वुमन वेल्फेअर असोसिएशनच्या सचिव प्रा. अमिता पाटील, प्रा. नीता पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रा. अमिता पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी बोलताना ॲड. भारती वाळवेकर यांनी एकविसाव्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरी स्त्री-पुरुष भेदभाव आजही कायम आहे असे सांगून लैंगिक हेतूने केलेले स्पर्श हे लैंगिक शोषण कसे ठरू शकते? त्यावर अंमलात आणले जाणारे कायदे कोणते?
याबाबत जागरूकतेची गरज आदींबाबत मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राध्यापिका, विद्यार्थिनी आणि महिला कर्मचारीवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता पाटील यांनी केले, तर शेवटी प्रा. नीता पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.