कर्नाटक सामान्य प्रवेश परीक्षेचा सीईटी निकाल उद्या सोमवार दि 20 सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध असणार आहे, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री डॉ. अश्वत नारायण यांनी दिली आहे.
राज्यात गेल्या 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी वेळात या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात यश मिळवले आहे असेही शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. आता उद्या सोमवारी 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता https://cetonline.karnataka.gov.in/kea/ या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे.