18.9 C
Belgaum
Monday, October 25, 2021
 belgaum

Daily Archives: Sep 18, 2021

गणेश विसर्जन मिरवणुकीत असा असणार बंदोबस्त

बेळगावचा गणेश उत्सव राज्यात सर्वात मोठा असतो त्यासाठी तसा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येतो दरवर्षी बेळगावची विसर्जन मिरवणूक पोलिसांसाठी एक आवाहनचं असते यावेळीही कोरोनाच्या नियमानुसार रात्री आठच्या आत विसर्जन पूर्ण करावे लागणार आहे गणेश मूर्ती सोबत विसर्जन तलावात...

बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरातील तलाव सज्ज

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला उद्या रविवारी 19 सप्टेंबर रोजी मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला जाणार असून नाझर कॅम्प येथील विसर्जन तलाव वगळता शहर उपनगरातील विविध 7 तलाव श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर कांहीनी परंपरेनुसार...

मनपा निवडणूक : आणखी एक तक्रार दाखल

बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी. तसेच अपारदर्शी झालेली ही निवडणूक रद्द करून मुक्त वातावरणात पारदर्शी पद्धतीने निवडणूक घेतली जावी, अशी मागणी मुख्य निवडणुक अधिकारी व जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. न्यू गांधीनगर येथील...

महिला व मुलींना संरक्षण द्या : जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करण्याबरोबरच बेळगाव शहर परिसरात विविध गुन्ह्यांसह महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या असल्यामुळे प्रशासनाने प्रामुख्याने महिला व मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी मानवाधिकार लोककल्याण व भ्रष्टाचार विरोधी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मानवाधिकार लोककल्याण...

बेळगावात होणार अधिवेशन : 10 कोटी मंजूर

बेंगलोर येथील अधिवेशनात बेळगावात विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात बेळगावात होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बेंगलोरमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यासाठी पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये हिवाळी अधिवेशन...

मेगा लसीकरण : बेळगाव देशात द्वितीय!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल 17 सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक मेगा लसीकरण अभियानात बेळगाव जिल्ह्याने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावून अत्युत्तम कामगिरी बजावली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. सदर मेगा लसीकरण अभियानामध्ये बृहन बेंगलोर...

कोरोनामुळे मृत्यु : नुकसान भरपाईसाठी आवाहन

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गरिबी रेषेखालील कुटुंबातील सदस्यांच्या नातलगांना 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार असून त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरिबी रेषेखालील कुटुंबातील ज्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी नुकसान भरपाई मिळण्याकरिता तालुका कार्यालय...

पुनश्च सुरू होणार पुणे – अर्नाकुलम साप्ता. स्पेशल एक्सप्रेस

बेळगाव मार्गे धावणारी पुणे -अर्नाकुलम साप्ताहिक स्पेशल एक्सप्रेस रेल्वे पुनश्च सुरू करण्याबरोबरच पनवेल व वडगाव मार्गे धावणारी पुणे अर्नाकुलम एक्सप्रेस स्पेशलची फ्रीक्वेंसी वाढविण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. रेल्वे क्र. 01197 पुणे -अर्नाकुलम साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रेल्वे येत्या 25 सप्टेंबरपासून...

गणपती विसर्जनादिवशी मार्कंडेय नदीकाठी करणार दिव्यांची व्यवस्था

आंबेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील मण्णूर, आंबेवाडी, गोजग्यासह हिंडलगा परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी मार्कंडेय नदीकाठावरील बंधारा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. येथील आंबेवाडी मण्णूर क्रॉसवरील मार्कंडेय नदीच्या बंधारा परिसरात दरवर्षी परिसरातील नागरिकांच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले...

एका दिवसात 2,57,604 लसींचे वितरण: जिल्हाधिकारी हिरेमठ

शुक्रवारी एका दिवसात 2 लाख 57 हजार 604 लसींचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ म्हणाले की, जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या मेगा लस वितरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकूण 3 लाख लोकांना लसी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले....
- Advertisement -

Latest News

त्या घटनेची सुरू चौकशी

बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान उतरताना पायलटच्या चुकीमुळे धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला अर्थात चुकीच्या बाजूला विमान उतरविण्यात आल्याची माहिती एका वर्तमानपत्राने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !