22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Sep 3, 2021

कॅटोंमेंट सीईओनी स्वीकारला पदभार

बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के आनंद यांनी शुक्रवारी सुत्रे स्विकारली. यापूर्वीचे सीईओ बर्चस्वा यांची आसाम (जोहराट) येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी जोहराट येथील सीईओ के आनंद यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा येथील कँण्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तत्पूर्वी...

मनपा निवडणूक: टक्का घसरला आता चर्चा पुढे कोण ची……

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक आज झाली. वेगवेगळ्या कारणांनी ही निवडणूक गाजली पक्षीय सहभाग, चढाओढ आणि बरेच काही या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाले. निवडणुकीचा टक्का घसरला आणि आता आकडेवारीत कोण पुढे येणार? याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय पक्षांची निराशा करणारी आकडेवारी...

बेळगाव मनपासाठी 50.41 टक्के मतदान

बेळगाव मनपासाठी 50.41 टक्के मतदान झाले -1 लाख 13हजार 396 पुरुष तर 103764 महिला मिळून 217160 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्राचे देखील लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया मतदार यादीतील नांवे गायब होण्याच्या प्रकारामुळे...

मतदान संपले; आता रंगली चर्चा निकालाची!

बेळगाव महानगरपालिकेच्या 58 प्रभागांसाठी आज निवडणूक मतदान प्रक्रिया समाप्त झाली असली तरी कोण -कोण निवडून येणार? निवडणुकीचा निकाल काय लागणार? याची चर्चा आत्तापासूनच गल्लोगल्ली रंगू लागली आहे. बेळगाव महापालिका निवडणुकीचे मतदान आज सायंकाळी शांततेत पार पडले आहे. मतदान समाप्त झाले...

रविवारी शहराचा वीज पुरवठा खंडीत

हेस्कॉमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. तातडीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी उपरोक्त वेळेत कॅन्टोन्मेंट, नानावाडी, हिंदवाडी, मारुती गल्ली, बेळगाव शहर,...

जाधवनगरातील नांवे मतदार यादीतून गायब : तीव्र संताप

गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान केलेल्या जाधवनगर येथील सुमारे 250 मतदारांपैकी 150 मतदारांची नांवे मतदार यादीतून गायब असल्याचा प्रकार आज सकाळी महापालिका निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खुद्द माजी आमदार कै. नारायण तरळे यांच्यासह अन्य काहींच्या संपूर्ण...

सुवर्ण सौधमध्ये स्थलांतरीत होणार साखर आयुक्तालय

मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासह बेळगाव सीमाभागावर हक्क सांगण्यासाठी हलगा -बस्तवाड येथे सुवर्ण विधानसौधची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरवणे अवघड जाऊ लागल्यामुळे विविध सरकारी कार्यालयांना या इमारतीचा ताबा देण्यास सुरुवात झाली असून आता साखर...

राजकीय पक्षाच्या दिवंगत नेत्याचे बॅनर्स

बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या बसवन कुडची येथील मतदान केंद्राच्या ठिकाणी काल रातोरात भाजप किसान मोर्चाच्या एका स्थानिक दिवंगत नेत्याचे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच निवडणूक आचारसंहितेचा भंग करून राजकीय स्वार्थासाठी केलेल्या या प्रकारामुळे मतदारांमध्ये तीव्र...

आता स्वयंपाकी, पुजारी, पुरोहितही असंघटित कामगार

असंघटित कामगार क्षेत्राची व्याप्ती वाढविण्यात आली असून यापुढे स्वयंपाकी कामगार, पुजारी आणि पुरोहितांचाही असंघटित कामगार वर्गात समावेश करण्यात आला आहे. यासाठी कामगार खात्याने ई -श्रम http:// eshram.gov.in हे संकेतस्थळ तयार केले असून पात्र लाभार्थीने यावर नोंदणी करावी, असे आवाहन...

मतदानाची टक्केवारी वाढणार

बेळगाव शहरात महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत नागरिक मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडत असून मतदान करण्याबद्दलचा उत्साह दिसून येऊ लागला आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीत वाढ होऊ लागली आहे.लोक अस्मितेने मतदान करण्यासाठी दाखल होत...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !