21.3 C
Belgaum
Sunday, May 22, 2022

Daily Archives: Sep 28, 2021

सुरू होणार स्टार एअरची बेळगाव तिरुपती विमानसेवा

बेळगावहुन तिरुपतीला श्री बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी स्टार एअर आनंदाची बातमी दिली आहे. नवरात्रीपासून बेळगाव हुन थेट तिरुपतीला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. 11 ऑक्टोबर पासून आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा चालू होणार आहे.सुरुवातीला दर आठवड्याच्या सोमवार आणि बुधवार ही...

नोकरीवर जाण्यास निघालेला क्लार्क बेपत्ता

बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील  रहिवाशी आणि भारतीय सैन्यात क्लार्क पदावर सेवा बजावणारे नितीन शंकर राऊत हे बेपत्ता झाले आहेत. मच्छे येथील गोडसे कॉलनीचे रहिवासी नितीन शंकर राऊत हे भारतीय सैन्यात क्लार्क म्हणून उत्तराखंडमधील हलधोनी येथे सेवा बजावतात. १९ सप्टेंबर २०२१ रोजी ते घरातून कामाच्या ठिकाणी रुजू होण्यास निघाले होते. मात्र त्यानंतर...

आत्तापासूनच सुरू झाली विधान परिषदेसाठी तयारी

विधान परिषद निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीनंतर परिषदेची निवडणूक होणार असली तरी आत्तापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. माजी मंत्री, माजी खासदार ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी...

8 लघु ग्रंथालयांचा उद्घाटन समारंभ उत्साहात

जंगलात दुर्गम भागात असणाऱ्या शालेय मुलांना अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अन्य माहितीपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्याद्वारे त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने फेसबुक फ्रेंड्स सर्कलने ऑपरेशन मदतच्या सहकार्याने सुरू केलेल्या 8 मिनी लायब्ररी अर्थात लघु ग्रंथालयांचा उद्घाटन समारंभ आज सकाळी उत्साहात...

नाईट कर्फ्यू : शहरात पोलिसांची मनमानी

कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागील आठवड्यात रात्रीचा कर्फ्यू आणखी शिथील करताना तो रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असेल असे जाहीर केले आहे. तथापि बेळगाव पोलीस मात्र रात्री 8 -8:15 वाजताच शहरातील व्यवहार बंद करण्यास भाग...

पुनश्च एकच अतिक्रमण निर्मूलन पथक होणार कार्यरत

बेळगाव शहरासाठी एकच अतिक्रमण निर्मूलन पथक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून येत्या 1 ऑक्टोबरपासून हे पथक शहरात कार्यरत होणार आहे. बेळगाव महापालिकेत 2019 पर्यंत एकच अतिक्रमण निर्मूलन पथक होते. अर्जुन देमट्टी यांच्याकडे अनेक वर्षे या पथकाची जबाबदारी होती. ते...

यंदाच्या रणजी आयोजनाबाबत साशंकता : पोतदार

कोरोना प्रादुर्भावामुळे कांही निर्बंध पाळावे लागत असले तरी धारवाड क्रिकेट विभाग (झोन) यावर्षी देखील नेहमीच्या सर्व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत आहे. मात्र कोरोना आणि बायोबबलमुळे रणजी सारख्या मोठ्या सामन्यांचे बेळगावमध्ये आयोजन करण्यास परवानगी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे?...

समिती नेते एका टेबलवर कधी येणार?

बेळगाव महानगरपालिकेत मराठी माणसाची झालेली हार सामान्य नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. मागील विधानसभेप्रमाणेच यावेळीही बेकिचाच फटका बसला आहे. ही बेकी मिटवून टाकण्यासाठी सर्व समिती नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी ही सामान्य जनतेची मागणी असून समिती नेते एका टेबलावर कधी...

कर्नाटकात 55 वर्षांपूर्वी धावली होती पहिली स्लीपर कोच बस

आजकाल स्लीपर कोच बसने प्रवास करणे निटीनेमाचे झाले आहे. लांबचा प्रवास असेल तर नागरिक स्लीपर कोचने प्रवास करणे अधिक पसंत करतात. कर्नाटकच्या पहिल्या स्लीपर कोच बसला आज 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. बेंगळुरू आणि हुबळी दरम्यान या बसने 55...

राज्यात 6 फॉरेन्सिक लॅब स्थापन करणार: मुख्यमंत्री बोम्मई

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी , फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज राज्यातील 6 शहरात स्थापन करण्यात येतील. ज्यात गुलबर्गा, हुबळी-धारवाड आणि म्हैसुरू यांचा समावेश आहे. जेणेकरून जलद तपास आणि गुन्हे शोधण्यात मदत होईल.हुबळी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की...
- Advertisement -

Latest News

रेडक्रॉस जिल्हा संघटनेने केले जिल्हाधिकार्‍यांचे स्वागत

भारतीय रेड क्रॉस संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !