येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्यास मी ही निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी स्पष्ट केले आहे.
एकसंबा (ता. चिक्कोडी) येथे ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या 35 वर्षापासून मी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करत आहे. मी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता असून 1988 पासून विधान परिषद सदस्य म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे.
तेंव्हा काँग्रेस हायकमांड आणि राज्याचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार तसेच सतीश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी मला विधान परिषद निवडणूक लढविण्याची संधी द्यावी.
जनतेने देखील प्रकाश हुक्केरी यांनी विधान परिषद निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. यासाठी ही निवडणूक लढविण्यास मी सज्ज आहे, असे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.