रानडुक्करांची शिकार करायला गेलेल्या आजोबाने बंदुकीतून झाडलेली गोळी शेतात काम करणाऱ्या नातवाच्या पायाला लागली त्यात नातू जखमी झाला होता या प्रकरणी या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे.मंगळवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील सोनट्टी गावात ही घटना घडली होती या प्रकरणी काकती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
शंकर बाळाप्पा राजकट्टी वय २२ रा राजकट्टी असे या घटनेत पायाला गोळी लागलेल्या नातवाचे नाव आहे. या प्रकरणी बाळाप्पा शिवराय मुचंडी याना अटक झाली आहे आहे.
या प्रकरणी समजलेल्या अधिक माहितीनुसार संशयित बाळाप्पा यांच्या शेतात रानडुक्करांचा वावर झाला असल्याने पिकांचे नुकसान होत आहे म्हणून ते शेतात नात वा सह शिकारीला गेले होते त्यावेळी डुक्करांची शिकार करायच्या उद्देश्याने झाडलेली गोळी नातवाच्या पायाला लागली त्यात तो जखमी झाला आहे.
जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णायालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. आजोबा शिवराम मुचंडी यांच्या नावावर डबल बार बंदूक होती .
त्याचा वापर त्यांचा मुलगा बाळाप्पा शिवराय मुचंडी यांनी केला त्यामुळे काकती पोलिसांनी बाप मुलावर गुन्हा नोंद करता अटक केली आहे . नातू शंकर यांच्या वार उपचार सुरु आहेत.