माळमारुती पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांच्या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, किंमती साहित्य, मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य असा सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकाने शहर परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोघा चोरट्यांना शिताफीने गजाआड करून त्यांच्याकडील सुमारे 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने,
जवळपास 1 लाख 50 हजार रुपयांचे किंमती साहित्य तसेच चोरीसाठी वापरलेली 60 हजार रुपये किंमतीची अवजारे जप्त केली आहेत. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
उपरोक्त कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील माळमारुती पोलिसांच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक होण्णप्पा तळवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. बी. कुंडद, के. डी. नदाफ, जगन्नाथ भोसले,
बसवराज कल्लपनावर, सी. आय. चिगरी, मुत्तप्पा भुमनाळ, गुडरैगोळ व मुशापुरे या पोलिसांचा समावेश होता. सदर पोलीस पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.