महाराष्ट्र एकीकरण समितीचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा सध्या सोशल मीडिया वरून जोरदार सुरू आहे
. वेग वेगळ्या कारणांनी पराभव झाल्याचे सोशल मीडियावर बोलले जात असून एम प्लस एम चा फॉर्मुला पुढे आल्यामुळे समितीचा पराभव झाल्याचेही बोलले जात आहे. हा फॉर्म्युला धोकादायक ठरला आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
हा फार्मुला सर्वात प्रमुख कारणीभूत ठरला असे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक होणार हे लक्षात आल्यानंतर काहीनी मुस्लिम व मराठा एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असे मुद्दे उपस्थित केले होते. त्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार टीकाही झाली होती .
महाराष्ट्र एकीकरण समितीने या निवडणुकीत मुस्लीम किंवा एम आय एम सारख्या संघटनांशी एकी करू नये या पद्धतीची चर्चा जोरात सुरू होती.
आणि आता यामुळेच पराभव झाल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने कधीही या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा केली नव्हती मात्र काही पातळीवर या मुद्द्यांची चर्चा झाल्यामुळे समितीचे नुकसान झाले आहे असे चित्र निर्माण झाले आहे.