भारतीय निवडणूक आयोगाने कर्नाटकातील सिंदगी आणि हनगल विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका येत्या 30 ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
सदर पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. देशातील कांही प्रदेशातील महामारी, पूर परिस्थिती, सण-वार आदींचा संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांतकडून आढावा घेतल्यानंतर सर्व वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन देशातील दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश, दिव -दमन केंद्रशासित प्रदेश, मध्य प्रदेश आणि हिमाचल
प्रदेशातील तीन लोकसभा मतदार संघातील रिक्त जागांसाठी तसेच विविध राज्यातील विधानसभा मतदारसंघांमधील 30 रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
सिंदगी आणि हनगल विधानसभा पोटनिवडणूकीची अधिसूचना 1 ऑक्टोबर रोजी जारी होणार असून 8 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे.
अर्जांची छाननी 11ऑक्टोबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर ही असणार आहे. निवडणुकीचे मतदान 2 नोव्हेंबर रोजी होणार असून सदर निवडणूक प्रक्रिया 5 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण केली जाणार आहे.