बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती तालुक्यातील रामपूरसाईट येथील शकिर अहमद अकबरसाब तोंडीखान या युवकाने यु पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्याने 583 वा क्रमांक मिळवला आहे.
31 वर्षीय शकिर अहमद याने यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते दुसऱ्या प्रयत्नात तो मुलाखाती पर्यंत पोहोचला होता यावेळी त्याला यश मिळाले असून त्याने 583 व्या रँक पर्यंत मजल मारली आहे.बंगळुरुच्या बी एम एस कॉलेज मधून बी ई पदवी मिळविलेल्या शकिर याने बंगळुरू सॅमसंग कंपनीत सेवा बजावली आहे.2014 मध्ये के पी एस सी परीक्षा चांगले गुण मिळवत उत्तीर्ण झाला होता युवा क्रीडा सबलीकरण खात्यात उपसंचालक म्हणून कार्य केले होते या शिवाय 2015 मध्ये पुन्हा एकदा केपीएससी उत्तीर्ण होत हुबळी येथील महसूल खात्यात सहाययक उपायुक्त म्हणून सेवा बजावली होती.2017 पासून शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना यु पी एस सी अभ्यास करत सदर परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
शकिरचे वडील अकबरसाब कृषी खात्यात सेवा निवृत्त कर्मचारी असून आई शहनाज बेगम गृहिणी आहेत.
हुक्केरी मध्ये दहावी पर्यंत शिकलेले शकिर यांनी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात दहावीत प्रथम क्रमांक पटकावला होता.आर एल एस कॉलेज बेळगाव येथे पी यु सी शिक्षण घेतले होते आदर्श विद्यार्थी पुरस्कार देखील मिळवला होता.
बंगळुरू येथील बीएमसी इंजिनिअरिंग कॉलेज मधून इ आणि सी मधून बी ई पदवी गोल्ड मेडल सह रँक पटकावत मिळवली होती.
कॅम्पस निवडीतून त्यांची सॅमसंग कम्पनीत नोकरीसाठी निवड झाली होती दीड वर्षे खाजगी कंपनीत नोकरी करून त्यांनी सरकारी नोकरीसाठी स्पर्धात्मक परीक्षा दिली होती.
आई वडिलांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यावर मी हे यश मिळवल आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.सतत प्रयत्नशील असल्याने मला हे यश मिळवता आले.के ए एस अधिकारी म्हणून काम करत असताना यु पी एस सी चा अभ्यास करून हे यश मिळवता आले .मागे केलेल्या चुका पुढे सुधारल्या त्यातून शिकत गेलो व परिक्षा उत्तीर्ण झालोअसेही त्याने म्हटलेआहे.
सुरुवातीला दिल्लीला कोचिंग घेतले होते शेवटी मी अनुभवातून शिकवण घेतली आणि यश मिळाल्याचे त्याने कबुली दिली.सतत प्रयत्न आणि स्वतावर विश्वास यामुळेच हे शक्य झाले असल्याचेही त्याने म्हटले आहे.