डसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एरव्ही बेळगावात पाऊस पडत नाही थंडी जोरात सुरू झालेली असते मात्र यावर्षी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडल्याने वातावरणात बदल झाला आहे.
रविवारी दुपारी नंतर बेळगाव तालुक्यातील ग्रामीण भागांत या वळीवाचा शिडकावा झाला.या पावसाने रब्बी कडपाल परिणाम व्हायची शक्यता आहे रिंग थंडीच्या दिवसात पाऊस झाल्याने एकीकडे मसूर वाटाणा हरभरा मोहरी सारखी पिके बाद होऊ शकतात तर नव्याने पेरणी झाल्याने कडपाल पिकाना फायदा देखील होऊ शकतो.
रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने बेळगाव शहर परिसरातील नागरी जीवन अस्त्रस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती एकीकडे हवेत गारटा झाल्याने वातावरणात बदल झाला आहे त्यामुळे लहान मोठे आजारांना वाव मिळालेला आहे.
सर्दी खोकला अश्या लहान आजारांनी अनेक जण त्रस्त झाले आहेत दिवसभर सूर्य देवाचे दर्शन न झाल्याने बोचरी थंडी जाणवत आहे. चिरचिरा पाऊस बोचरी थंडी म्हळके वातावरण यामुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे .
दुसरीकडे रविवार असल्याने अनेकांनी घरात टी व्ही समोर बसणे पसंत केले आहे. हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत बेळगावचे वातावरण उल्लासदायक असते मात्र या ओल्या हिवाळी वातावरणाने माहोल कंटाळवाणा बनला आहे.