बेळगावहून दिल्ली व मुंबई या शहरांना दररोज विमान सुरू करावी अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
बेळगाव हून बंद झालेल्या या विमान सेवा साठीची मागणी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पोचवली आहे. गेल्या 10 डिसेंबर पासून सदर सेवा बंद झाल्या होत्या अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती अखेर जागे झालेल्या बेळगावच्या खासदारांनी विमान सेवेसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे.खासदार मंगला अंगडी, इरणा कडाडी, आणि चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी विमान उड्डाण मंत्री सिंदिया यांची भेट घेतली आहे.
बेळगावहून दिल्ली व मुंबई या शहरांना दररोज विमान सेवा सुरू नसल्याने व्यापारी, उद्योजकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना एक तर हुबळी अथवा गोव्यापर्यंतचा रस्ते प्रवास करत विमानाने दिल्लीला जावे लागते.
याखेरीज चार वर्षानंतर पहिल्यांदा येत्या 11 जानेवारी रोजी दिल्ली येथे ऑटो एक्स्पो होणार आहे. त्यामुळे बेळगावसह परिसरातील उद्योजक, व्यापारी दिल्लीला जाणार आहेत.
ऑटो एक्स्पोमध्ये टाटा, हुंडाई, सुझुकी यासह अनेक मोठ्या कंपन्या सहभागी होतात. बेळगाव मधील स्पेअर पार्ट्स विक्रेते खरेदीसाठी तेथे जातात त्याचबरोबर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने दररोज विमान सेवा सुरू करण्याची मागणी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनतर्फे नुकतीच खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांच्याकडे करण्यात आली होती.
असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील यांनी तसे निवेदन कडाडी यांच्याकडे पाठवले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेत खासदार (राज्यसभा) इराण्णा कडाडी यांनी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना त्वरेने बेळगावहून दिल्ली व मुंबई येथे दररोज विमानसेवा सुरू करावी अशी विनंती केली. तसेच तशा आशयाचे निवेदन त्यांना सादर केले. याबद्दल बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.