छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर संगोळी रायण्णा यांच्यासारख्या या महान नायकांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो, असे केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी सांगितले.
शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळेच बेळगावात ही तणावाची परिस्थिती उद्भवली आहे. येथे संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची कुणीतरी नासधूस केली आहे.
या घटनांचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो. बेंगलोर आणि बेळगावातील घडलेल्या दोन्ही घटनांमुळे निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती राज्यभरात पसरू शकते असे सांगून पोलिसांनी दोन्ही घटनांमधील दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जारकीहोळी यांनी केली.
कायदा व सुव्यवस्थेसह समाजातील शांतता भंग करण्याचे हे जे प्रकार घडले आहेत, त्याला राज्य सरकार आणि पोलीस खात्याचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. तेंव्हा मुख्यमंत्री बसवराज मुंबई आणि गृहमंत्री आरोग्य ज्ञानेन्द्र यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.
त्यामुळे भविष्यात असे प्रकार करण्यास पुन्हा कोणी धजावणार नाही, असे आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. बेंगलोर येथील घटनेमुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले.