बेंगळूरच्या सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची घटना ही अत्यंत निंदणीय आणि घृणास्पद कृती असून समस्त जगतातील शिवप्रेमी जनतेच्या भावनांचा अनादर करणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असून त्यांचा अवमान महाराष्ट्र आणि सीमा भागातील मराठी जनता सहन करणार नाही. मराठी द्वेषाची कावीळ झालेल्या काही कन्नड संघटना गेले अनेक दिवस छत्रपती शिवाजी महाराजां
बद्दल अवमानकारक वक्तव्ये करण्याबरोबरच पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज
यांचा इतिहास आणि कर्तृत्व माहित नसणारी कांही मंडळी
जाणीवपूर्वक असले प्रकार करीत आहेत.
कर्नाटक सरकारने याबाबत योग्य आदेश देऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करावी. महाराष्ट् सरकारनेही यासंदर्भात कर्नाटक सरकारशी संपर्क साधून मराठी अस्मितेवरील घाला सहन केला जाणार नाही याची जाणीव करून द्यावी.
छत्रपती शिवाजी महाराज द्वेष्ट्या संघटनांचा निषेध करण्यासाठी जमलेल्या जनतेतील काही नेते मंडळी व कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांनी खोट्या केसीस दाखल केल्या आहेत .
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती मराठीद्वेष्ठ्या कन्नड संघटना आणि प्रशासनाचा निषेध करीत आहे असे पत्रक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अध्यक्ष दीपक दळवी ,कार्याध्यक्ष मनोहर किणेकर सरचिटणीस मालोजी अष्टेकर,खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी प्रसिद्ध केले आहे.