हलगा मच्छे बायपास विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या बेळगाव दिवाणी न्यायालयातील खटल्यांमध्ये शेतकऱ्यांना आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळाला आहे. अशी बाजू शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी मांडली आहे.
सुरुवातीपासूनच महामार्ग प्राधिकरणाने अनेक बेकायदेशीर कृत्ये करून हा बायपास बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही .शेतकऱ्यांनी न्यायालयात आपली बाजू व्यवस्थितपणे मांडल्यामुळे प्राधिकरणाला काही करता आले नाही. अन्यथा हा बायपास केव्हाच उरकण्यात आला असता. मात्र आता तो करणे कठीण बनले आहे.
25 जानेवारीपर्यंत बायपासला पुन्हा स्थगिती देण्याचा निर्णय हा न्यायालयाने शेतकऱ्यांना दिलेला सर्वात मोठा विजय आहे. असे प्रतिपादन गोकाककर यांनी केले. हा महामार्ग नाही.येथे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आहेत.प्रशासन जेसीबी लाऊन जे काम करीत आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर असून त्याला मज्जाव करावा.अशी मागणी शेतकऱ्यांच्या बाजूने लावून धरण्यात आली.
सुनावणी सुरू असताना काम सुरू झाल्यानंतर स्थगिती द्या अशी मागणी करण्यात आली. ही स्थगिती उठविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले.मात्र याचदरम्यान शेतकऱ्यांच्या मूळ अर्जावर सुनावणी सुरू करण्यात आली.हा महामार्ग नाही,झीरो पॉइंट तिथे नाही आणि सेक्शन 10 महामार्ग कायद्याप्रमाणे दुरुस्ती केलेली नाही.ही बाजू न्यायालयासमोर योग्यरीतीने मांडली गेली. महामार्ग प्राधिकरणाकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाही. जोपर्यंत हा पुरावा देत नाहीत तोवर कोर्टासमोर येऊ नये अशी मागणी केल्यामुळे कोर्टातर्फे प्राधिकरणाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.असेही त्यांनी सांगितले.
हा बायपास अनधिकृत आहे आणि तांत्रिक गोष्टींना धरून नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करणार आहे. ही बाजू न्यायालयात मांडण्यात आल्यामुळे हा शेतकऱ्यांचा विजय झाला आहे असे त्यांनी शेवटी सांगितले.